शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत उच्च न्यायालयाने शिंदे गटाला धक्का देत ठाकरे गटाला दिलासा दिला आहे. दसरा मेळाव्याला शिवसेनेला परवानगी नाकारणारा मुंबई महापालिकेचा निर्णय अयोग्य असल्याचं न्यायालयाने नमूद केलं. यामुळे शिवसेनेत उत्साहाचं वातावरण आहे, तर शिंदे गट मात्र नाराज आहे. मुंबई महापालिकेने या मेळाव्याला परवानगी न देण्याचा निर्णय कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग असल्याचं उच्च न्यायालयाने म्हटलं होतं.
न्यायालयाच्या याच निकालावर माध्यम प्रतिनिधींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे. रात्री उशिरा एकनाथ शिंदे ठाण्याकडून मुंबईकडे निघाले होते. तेव्हा माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला. पण एकनाथ शिंदेंनी हातवारे करत "प्रवक्ते बोलतील", एवढंच उत्तर दिलं. पत्रकारांच्या इतरही प्रश्नांना त्यांनी उत्तर दिलं नाही.
उच्च न्यायालयाच्या दसरा मेळाव्यासंदर्भातल्या निकालावरुन शिवसेनेने आनंद व्यक्त केला आहे. ‘‘दसरा मेळावा ही आपली परंपरा आहे. शिवसैनिक आणि शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी दसरा मेळाव्यासाठी उत्साहात, गुलाल उधळत वाजत गाजत या,’’ अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याचं आमंत्रण दिलं आहे. तर दुसरीकडे दसरा मेळाव्याच्या निर्णयामुळे शिंदे गटात प्रचंड नाराजी आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.