एसटीला "रिंगण' लाभदायी! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

मुंबई - पंढरपूरच्या आषाढी वारीतील शेवटचा रिंगण सोहळा एसटीला विशेष लाभदायक ठरला आहे. चंद्रभागा बस स्थानक ते बाजीराव विहीरदरम्यान चालवलेल्या 100 बसद्वारे महामंडळाला तब्बल पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 

21 जुलैला (नवमी) बाजीराव विहीर येथे शेवटचे रिंगण पार पडले. महामंडळाने चंद्रभागा बसस्थानक ते बाजीराव विहीरदरम्यान 100 बसच्या 500 फेऱ्या चालवल्या. स्थानक ते विहीर या अंतरासाठी महामंडळाने एकेरी 20 रुपये तिकीट आकारले. वारीच्या काळात 18 ते 28 जुलैदरम्यान वारी विशेष म्हणून महामंडळाने तीन हजार 781 फेऱ्या चालवल्या. 

आरोग्य सुविधा 
वारी काळात चार बस स्थानकांवर एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी दोन वेळ जेवण आणि चहाची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. वैद्यकीय सुविधा केंद्रात तीन हजार 500 वारकऱ्यांनी लाभ घेतला. 

Web Title: ST bus special benefit due to Ringan sohala