काळजी करु नका.. मी लक्ष घालेन; पण आत्महत्या थांबवा; राज ठाकरेंचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray

राज्यात एसटी महामंडळाचे कर्मचारी आपल्या काही मागण्या घेऊन वेगवेळ्या स्वरूपातील आंदोलन करताना दिसून येत आहेत.

काळजी करु नका, मी लक्ष घालेन; पण आत्महत्या थांबवा : राज ठाकरे

मुंबई : मुंबई : राज्यात एसटी महामंडळाचे (ST Corporation) कर्मचारी आपल्या काही मागण्या घेऊन वेगवेळ्या स्वरूपातील आंदोलन करताना दिसून येत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी संप केल्यानंतर राज्य सरकारनं काही मागण्या मान्य केल्या. परंतु, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारमध्ये सहभाग करून राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू होणाऱ्या सर्व सुविधा मिळाव्यात, ही मागणी घेऊन कर्मचारी आंदोलन करत आहेत. आज एसटी कर्मचारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांच्या भेटीला (मुंबई) गेले असून त्यांनी आपल्या व्यथा राज ठाकरेंसमोर मांडल्या आहेत.

यावर राज ठाकरे म्हणाले, कोणताही प्रश्न सोडवत असताना त्याला आत्महत्या करणं हा पर्याय नाही, त्यामुळं कुणीही आत्महत्येचं पाऊल उचलू नये, असं आवाहन त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केलंय. आज 1 लाख कर्मचारी प्रतिनिधी म्हणून आम्ही मनसे अध्यक्षांची भेट घेतलीय. याप्रश्नी राज ठाकरेंनी आम्हाला पाठिंबा दिला असू मी लक्ष घालेन, असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलंय. त्यामुळं राज्य सरकार आमच्या मागणीचा विचार करुन आम्हाला न्याय देईल, अशी अपेक्षाही एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: अटीतटीच्या लढतीत सहकारमंत्र्यांसह गृहराज्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

यावेळी राज ठाकरेंसमोर व्यथा मांडताना कर्मचारी म्हणाले, आमची संपूर्ण दिवाळी रस्त्यावर गेली असून बायका-पोरांना कपडे घ्यायला आमच्याकडे पैसे नाहीत, अशी आमची गत झालीय. आयोगानुसार आम्हाला नोव्हेंबर-डिसेंबरचा पगार मिळावा व हा प्रश्न सरकारनं तातडीनं सोडवावा, अशी आमची मागणी आहे. राज ठाकरे आमच्या मागणीचा विचार करुन आम्हाला पाठिंबा देतील, अशीही अपेक्षा आहे. मनसे अध्यक्ष ठाकरे यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी आज भेट देत आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. यावेळी राज ठाकरे यांनीही कर्मचाऱ्यांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलंय.

loading image
go to top