एसटीची ३२ टक्के वेतनवाढ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

मुंबई - ‘‘महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आजपर्यंत केलेल्या सर्व वेतनवाढी एकत्रित केल्या तरी होणार नाही एवढी वेतनश्रेणीमधील सुधारणा आम्ही केली आहे. कर्मचाऱ्यांच्या चार वर्षांचा करार ४८४९ कोटी रुपयांचा होणार आहे. केंद्राच्या सातव्या वेतन आयोगाचे २.५७ सूत्र वापरून वेतनवाढी तयार केल्या आहेत, ही वेतनवाढ ३२ ते ४८ टक्के आहे,’’ असा दावा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केला. 

एसटी महामंडळाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. रावते म्हणाले, ‘‘कनिष्ठ वेतनश्रेणीतील कर्मचाऱ्यांना मागील करारामधील वेतनवाढीत अन्याय झाला आहे तो कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. सुधारित वेतनवाढ मान्यतेसाठी प्रशासनाने दिलेल्या संमतीपत्रावर सात जूनपर्यंत सही करणे आवश्‍यक आहे. ज्यांना ही वेतनवाढ मान्य नाही त्यांच्यासाठी महामंडळाची सुवर्णसंधी आहे. राजीनामा दिल्यास चालकाकरिता २० हजार रुपये व वाहकाकरिता १९ हजार रुपये वेतनावर कंत्राटी पद्धतीने नोकरी दिली जाईल. त्यांना प्रति वर्षी २०० रुपये वाढही मिळेल.’’

दै ‘सकाळ’मध्ये आलेल्या बातमीमुळेच हुतात्म्यांच्या पत्नीला मोफत पास व वारसाला नोकरीची संधी देण्याचा निर्णय घेतल्याचा उल्लेख रावते यांनी केला.

परिवहन मंत्र्यांनी केलेल्या एकतर्फी वेतनवाढीच्या घोषणेच्या माहितीचे अधिकृत व सुस्पष्ट पत्र मिळालेले नाही. परंत, प्रथमदर्शनी या प्रस्तावात गोलमाल केलेली आकडेवारी दिसून येत आहे. भत्त्यात व कनिष्ठांनासुद्धा वाटाघाटीत मान्य केल्याप्रमाणे लाभ दिलेला दिसून येत नाही. या प्रस्तावाने कामगार समाधानी होतील असे वाटत नाही. मात्र, संमतीपत्र जबरदस्तीने भरून घेण्याचा प्रयत्न झाल्यास उद्रेक होईल. 
- संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

२.५ ते १२ हजारांची वाढ
    कनिष्ठ वेतनश्रेणीवर अनुक्रमे ३ व ५ वर्षे काम केलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात आता किमान २, ५८१ रुपये ते कमाल ९,१०५ रुपये वाढ 
    नियमित वेतनश्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात आता ३,६९२ रुपये ते १२,०७१ रुपये वाढ

नवे भत्ते (रुपयांत)
हजेरी प्रोत्साहन
(४२ दिवसांसाठी) १२०० 
धुलाई १०० 
रात्रपाळी ३५ ते ४५ 

रात्रवस्ती
(सर्वसाधारण ठिकाणी) ७५ 
रात्रवस्ती(जिल्हा ठिकाणी) ८०

Web Title: ST employee raises 32% increments