एसटीत नियुक्तीसाठी नागपुरात उमेदवारांकडून पैशांची वसूली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Money Recovery

कोरोना आणि संप काळामूळे 2019 मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. मात्र, नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्तीसाठी हिरवी झंडी दाखवली.

St Recruitment Bribe Case : एसटीत नियुक्तीसाठी नागपुरात उमेदवारांकडून पैशांची वसूली

मुंबई - एसटी महामंडळात 2019 मध्ये चालक तथा वाहक पदांसाठी घेण्यात आलेल्या सरळ सेवा भरती मधील पात्र उमेदवारांना अंतीम वाहन चालन चाचणीत अपात्रतेची भिती दाखवून पैसे उकळण्यात आल्याचे धक्कादायक व्हिडीओ सकाळच्या हाती लागला आहे. यामध्ये प्रत्येकी 3 हजार रूपयांची मागणी करण्यात आल्याचा उमेदवारांकडून आरोप केला जात असून, सकाळ च्या हाती लागलेल्या व्हिडीओ मध्ये प्रत्यक्षात 2100 रूपयांची जुळवाजुळव करत असल्याचे उघड झाले आहे.

कोरोना आणि संप काळामूळे 2019 मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. मात्र, नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्तीसाठी हिरवी झंडी दाखवली, त्यानंतर राज्यातील प्रत्येक विभागांमध्ये सरळ सेवा भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांची अंतीम वाहन चालन चाचणी घेऊन त्यांना नियुक्त्या देण्यात आल्या आहे. यामध्ये मोटार वाहन कायद्यांतर्गत नियमांची चाचणी घेतली जाते. त्यामध्ये वाहन चालन चाचणीमध्ये सुमारे 18 प्रकारच्या वाहतुक नियमांचे पालन केले जाते की नाही. याबाबत तपासणी घेऊन त्यांची नियुक्ती दिली जाते.

मात्र, नागपुर विभागातील धापेवाडा बस स्थानकांवर अंतीम वाहन चालन चाचणीत ज्या उमेदवारांना वाहतुक नियमांचे पालन करता आले नाही. किंवा वाहतुक नियमांचे पालन करूनही अपात्र करण्याची भिती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आल्याचा व्हिडीओ सकाळ च्या हाती लागला आहे. त्यामध्ये स्वतहा उमेदवार प्रत्येकी 2100 रूपये गोळा करत असून, अंतीम यादी जाहीर होण्यापुर्वी पैसे दिल्यास उमेवारांना अपात्रतेची चिंता राहणार नसल्याची चर्चा उमेदवारांमध्ये होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामूळे एसटी महामंडळाच्या एकूणच सरळ सेवा भरतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

इतरही विभागात पैशांची लुट

राज्यभरात 17 ते 31 आॅक्टोंबर पर्यंत अंतीम वाहन चालन चाचणी घेऊन नियुक्ती देण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे राज्यभरातील प्रत्येक विभागात वाहन चालन चाचणी घेण्यात आली. त्यापैकी नागपुर विभागातील धापेवाडा बस स्थानकाचा धक्कादायक व्हिडीओ पुढे आल्यानंतर आता, राज्यातील इतरही विभागांमध्ये अंतीम निवडीसाठी पैशाची लुट झाल्याचे नाकारता येत नसल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू

नागपुर विभागातील 183 उमेदवारांच्या अंतिम निवडीसाठी वर्धेच्या यंत्र अभियंता चालक ज्योती उके, विभागीय वाहतुक अधिकारी चंद्रकात वडस्कर, सहाय्यक वाहतुक निरिक्षक प्रमोद वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली होती. उमेदवारांकडून पैशांची वसूलीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

संबंधीत प्रकरणावर प्रतिक्रीया देण्यासाठी मी अधिकृत नाही. त्यामूळे काहीही बोलता येणार नाही. प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

- धम्मरत्न डोंगरे, वरिष्ठ सुरक्षा दक्षता अधिकारी, नागपुर