एसटीची ऐतिहासिक पगारवाढ फसवी - मुंडे

Dhananjay-Munde
Dhananjay-Munde

मुंबई - राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना 4 हजार 849 रुपयांची ऐतिहासिक पगारवाढ दिल्याची परिवहनमंत्र्यांची घोषणा फसवी असून, कर्मचाऱ्यांना अद्यापही या वेतनवाढीचा लाभ मिळालेला नाही. दिवाळीपूर्वी ही वेतनवाढ न मिळाल्यास राज्यातील एसटी कर्मचारीही सरकारला आणि परिवहनमंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नाहीत, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी दिला.

मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या उपोषणाला त्यांनी आज भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. त्या वेळी ते बोलत होते. ज्या ज्या वेळी सरकार "ऐतिहासिक' शब्द वापरते तेव्हा तेव्हा फसवणूक होणार, हे नक्की असते. ऐतिहासिक कर्जमाफी म्हणून केलेली कर्जमाफी फसवी निघाली, त्याचप्रमाणे रावते यांची ऐतिहासिक पगारवाढीची घोषणाही फसवी निघाली आहे. अद्याप कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही, यामुळे आता मी स्वतः कामगारांच्या खांद्याला खांदा लावून लढा देईन. अधिवेशनापूर्वी हा लाभ न मिळाल्यास अधिवेशन चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

हे सरकार एसटी महामंडळासह महाराष्ट्राला विकून टाकायला निघाले आहे. या सरकारला उलथवून टाकण्याची गरज असून, एसटी कर्मचाऱ्यांनीच सरकारची घंटी वाजविण्याची वेळ आली आहे.
- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com