ST STRIKE: विलीनीकरणाची मागणी मान्य होऊ शकत नाही - अनिल परब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Parab

ST STRIKE: विलीनीकरणाची मागणी मान्य होऊ शकत नाही - अनिल परब

राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने आता आक्रमक रुप धारण केल्याचं दिसतं आहे. एसटी कर्मचार्यांच्या संपाच्या आज सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली.

हेही वाचा: महागाईवरून लक्ष हटवण्यासाठी दंगलीचे कटकारस्थान : संजय राऊत

परिवहन मंत्री अनिल परब यांनी यावेळी बोलताना, समितीने जर विलीणीकरणाबाबत सकारात्मक अहवाल दिला तर प्रश्न सुटेल मात्र, जर अहवाल नकारात्मक दिला तर काय करायचं म्हणून, आता सध्या याबाबत निर्णय घेता येणार नाही असे सांगितले. बैठकीत विलीणीकरणाच्या बाबतची मागणी होती पण ही मागणी आम्ही मान्य करू शकत नाही असं सांगितलं. कारण हे प्रकरण हायकोर्टात आहे. 12 आठवड्यांचा वेळ समितीला दिलेली असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं.

हेही वाचा: गडचिरोलीत 6 नक्षलवाद्यांना कंठस्नान, काँबॅट ऑपरेशन यशस्वी

अनिल परब यांनी यावेळी बोलताना आम्ही हवं तर वेळ कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकतो असं सांगितलं आहे. वेतन वाढीचा प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनानुसार विचार करू अस सांगितलं आहे. पुढे ते असंही म्हणाले की, संप चालणं हे एसटीसाठी आणि त्यांच्यासाठीही योग्य नाहीये. माझ्या बाजूने सगळं सांगितलं आहे. एसटी कामगारांनी लवकरात लवकर संप मागे घ्यावा अशी विनंती देखील त्यांनी पुन्हा केला. दरम्यान, शरद पवारांशी सकाळी माझी भेट झाली चर्चा झाली असून, या मुद्दावर कसा तोडगा काढता येईल यावर चर्चा झाली असेही त्यांनी सांगितले.

loading image
go to top