राज्यातील एसटी ‘CNG’च्या दिशेने; महिन्याभरात घडणार बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST on cng

राज्य परिवहन महामंडळाचा प्रवास ‘ई बस’नंतर आता सीएनजीच्या दिशेने सुरु झाला आहे.

राज्यातील एसटी ‘CNG’च्या दिशेने; महिन्याभरात घडणार बदल

पुणे - राज्य परिवहन महामंडळाचा प्रवास ‘ई बस’नंतर आता सीएनजीच्या दिशेने सुरु झाला आहे. राज्यातील १ हजार एसटी गाड्यांचे डिझेल वरून सीएनजीमध्ये रूपांतर केले जात आहे. याचे प्रोटोटाईप बनविण्याचे देखील काम सुरु झाले असून येत्या महिन्याभरात सर्व चाचणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात सीएनजी बसविण्याचे काम होणार आहे. पहिल्या टप्यांत पुणे विभागातील तीन आगारांचा यात समावेश केला आहे.

राज्य परिवहन महामंडळाने डिझेलवर होणार खर्च कमी करण्यासाठी व पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या इलेक्ट्रिक व सीएनजी बसला प्राधान्य दिले आहे. ई बसला चांगला प्रतिसाद लाभत आहे.

आठ वर्षांखालील गाड्यांचा समावेश

राज्य परिवहन महामंडळ ज्या १ हजार एसटी गाड्यांचे सीएनजी मध्ये रूपांतर करणार आहे. त्या १ हजार गाड्या या सर्व ८ वर्षां खालील असणार आहे. त्यामुळे त्याची स्थिती चांगली असणार आहे. इंजिनसह अन्य बाबी चांगले असतील या उद्देशाने एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. एसटीचे सामान्यपणे १५ वर्षांचे आयुर्मान असते.

दर महिन्याला ३० गाड्या

राजगुरुनगर, शिरूर व बारामती हे तीन आगार सीएनजीसाठी निवडलेले आहेत. टोरॅन्टो गॅस कंपनीकडून या विभागांना गॅसचा पुरवठा होणार आहे. या तिन्ही विभागाचे दर महिन्याला प्रत्येकी ३० एसटीगाड्या डिझेल वरून सीएनजी मध्ये रूपांतर केले जाणार आहे. दुसऱ्या टप्यांत शहरी भागांतील आगरांचा समावेश केला जाईल.

प्रोटोटाईपचे काम सुरु आहे. एक - दोन महिन्यांत हे तयार होणार असून त्यांनतर रेट्रीफिटिंगचे काम होणार आहे. पहिल्या टप्यांत १ हजार एसटी सीएनजीवर धावतील.

- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचा लक, राज्य परिवहन महामंडळ, मुंबई

Web Title: St Towards To Cng In The Maharashtra State

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :maharashtraSTcngMSRTC