एस.टी. बसेसमध्ये आजपासून वाय-फाय 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - सुरक्षित, आरामदायी प्रवासाबरोबर मनोरंजनात्मक प्रवासाची अनुभूती आता एस.टी.च्या प्रवाशांना घेता येणार आहे. राज्यातील दोन हजार बसेसमध्ये वाय-फाय सेवा सुरू झाली आहे. पुढील टप्पा म्हणून मुंबई, पुणे, ठाणे पाठोपाठ आता कोल्हापुरातील 127 बसेसमध्ये ही सेवा मिळणार आहे. 

एस.टी. महामंडळाच्या बसेसमधून जवळपास 70 हजार प्रवासी रोज प्रवास करतात. कित्येक तासांचा हा प्रवास अनेकांना कंटाळवाणा वाटतो. अशा वेळी काहीजण एस.टी.ने प्रवास करणेही टाळतात. त्यामुळे प्रवाशांबरोबर एस.टी.चे नुकसान होऊ शकते. तरी प्रवाशाला आनंददायी प्रवासाचा आनंद घेता यावा, यासाठी वाय-फाय सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी महामंडळातर्फे राज्यातील 18 हजार बसगाड्यांमध्ये वाय-फाय सेवा सुरू करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात दोन हजार बसेसमध्ये ही सुविधा सुरू झाली आहे. यात कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातील 127 बसेसमध्ये उद्या (ता. 17)पासून ही सुविधा कार्यान्वित होणार आहे. त्यानंतर काही कालावधीत ग्रामीणसह सर्व आगारांतील बसेसमध्ये अशी सुविधा टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. 

प्रत्येक एस.टी. बसमध्ये वाय-फाय तंत्रज्ञानावर आधारित मनोरंजनाची सेवा प्रवाशांना घेता येणार आहे. त्यासाठी बसमध्ये हॉट स्पॉट बसविला जाईल. त्याद्वारे प्रवाशांना मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट, मालिका, गाणी, कार्टून्स मोबाइलवर पाहता येणार आहेत. यंत्र मीडिया सोल्युशन कंपनीतर्फे तांत्रिक सुविधा दिली आहे. प्रवाशाने एकदा ही सुविधा डाऊनलोड करून घेतली की, ती कायमस्वरूपी प्रवास करताना वापरता येणार आहे. 

Web Title: ST Wi-Fi in buses today

टॅग्स