एसटी कामगारांना हवा १५ हजारांचा बोनस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी १५ हजार रुपये बोनस देण्याची मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेने केली आहे.

मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी १५ हजार रुपये बोनस देण्याची मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेने केली आहे. 

कामगार करारातील तरतुदीनुसार पात्र कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिले जाते. मागील आर्थिक वर्षासाठी एसटीचे कर्मचारी सानुग्रह अनुदानास पात्र होत नाहीत. त्यामुळे या वर्षी सर्वच कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी बोनस मिळणार नाही. एसटी महामंडळात सुमारे एक लाख कामगार आहेत. या कामगारांची दिवाळी गोड होण्यासाठी या वर्षी १५ हजार रुपये बोनस देण्याची मागणी कामगार संघटनेने केली आहे.

‘‘रेल्वे, बेस्ट, महापालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहीर होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना मान्य करूनही भत्ते दिले जात नाहीत. त्यामुळे अडचणीतील एसटी कामगारांना दिवाळीत १५ हजार रुपये बोनस मिळाला पाहिजे, ’’ असे महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST workers demand Rs fifteen thousand bonus