ST Workers Strike - एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच; अनिल परब यांनी दिला इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Parab

एसटीने प्रवास करणारे प्रवासी हे आपलं दैवत आहेत. त्यांनी आपल्याकडे पाठ फिरवली तर एसटी अधिक अडचणीत येईल असंही अनिल परब म्हणाले.

...तर एका दिवसाला ८ दिवसाची पगारकपात - अनिल परब

एसटीचे सरकारमध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारने वेतनवाढीची घोेषणा करताना कर्मचाऱ्यांनी कामावर परत यावं असं आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं होतं. मात्र तरीही कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाची मागणी करत संप सुरुच ठेवला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचं आवाहन केलं आहे.

अनिल परब म्हणाले की, न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरवला तर एक दिवसाला 8 दिवसांची पगारकपात केली जाईल. कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान करायचे नाहीय. जे कर्मचाऱी कामावर येतील त्यांना संरक्षण दिलं जाईल.

एसटीने प्रवास करणारे प्रवासी हे आपलं दैवत आहेत. त्यांनी आपल्याकडे पाठ फिरवली तर एसटी अधिक अडचणीत येईल. कामगारांनी कारवाई करण्यासाठी भाग पाडू नये. जे कर्मचारी कामावर येऊ इच्छित आहेत त्यांना संरक्षण दिलं जाईल आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशाराही अनिल परब यांनी दिला.

हेही वाचा: संविधानाची मूल्ये जपायला हवीत; PM मोदींनी व्यक्त केली चिंता

दरम्यान, राज्यातील अनेक ठिकाणी आगारांमध्ये संप सुरुच आहे. तर दुसरीकडे काल भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आपण आंदोलनातून तुर्तास माघार घेत आहे सांगत संपाची पुढची वाटचाल कर्मचाऱ्यांनी ठरवावी असं म्हटलं होतं. त्यानंतर कर्मचारी संपावर ठाम राहात आंदोलन सुरुच ठेवलं आहे.

loading image
go to top