'एसटी' आंदोलनाची नवी ठिणगी; वाटेगावात ST दाखल होताच झाली दगडफेक : ST Workers Strike | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st

'एसटी' आंदोलनाची नवी ठिणगी; वाटेगावात ST दाखल होताच झाली दगडफेक

नेर्ले(इस्लामपूर) : संपूर्ण महाराष्ट्रात एसटीचा (ST Workers Strike) संप सुरू असताना वाळवा (valwa) तालुक्यातील इस्लामपूर (Islampur) आगारातून वाटेगाव ता. वाळवा येथे गेलेल्या एसटीला अज्ञात व्यक्ती कडून फोडण्यात आले. दुपारी साडे तीनच्या सुमारास ही घटना घडली.घटनेची माहिती मिळताच कासेगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. एसटी चालक व वाहक यांनी याबाबत कासेगाव पोलिसांना माहिती दिली. एसटी फोडल्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना असून आंदोलनाची ही ठिणगी पडली आहे. अज्ञात व्यक्तींच्या विरोधात कासेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, एसटीचे आंदोलन सुरू आहे. इस्लामपूर आगारातून वाटेगाव ता. वाळवा येथे वाहक मनोज देसाई व ए. बी. देसाई या एसटी कर्मचाऱ्यांनी इस्लामपूर मधून दुपारी सव्वा दोनच्या सुमारास एसटी वाटेगावला रवाना केली. साडेतीनच्या सुमारास वाटेगाव येथील मुख्य चौकात आल्यानंतर चार अज्ञात इसमांनी तोंडाला रुमाल बांधून एसटीवर हल्ला केला. यात एसटीचे नुकसान झाले.

महाराष्ट्रामध्ये एसटी आंदोलनाचा प्रश्न चिघळत चालला आहे. महिला कर्मचाऱ्यांसह एसटी आगारामध्ये तळ ठोकून आहेत. तर काही कारवाईच्या भीतीने कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी न होता एसटी सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. तालुक्यातील इस्लामपूर येथील आगारात गेल्या पाच दिवसांपासून एसटीचे विलगीकरण मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. परंतु आज दुपारी अचानक इस्लामपूर ते वाटेगावकडे जाणारी एसटी बाहेर पडली. त्यामुळे आंदोलक कर्मचाऱ्यांच्यामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. शासनाच्या निलंबनाला घाबरून कर्मचाऱ्यांनी असा निर्णय घेतल्याचं बोलले जात आहे.

हेही वाचा: सलमान खुर्शीद यांना ISIS संघटनेच्या ताब्यात द्या ; नितेश राणे

या घटनेमुळे 'एसटी'च्या कर्मचारी व संपकरी यांना प्रवासी लोकांचा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. आगारामध्ये खासगी वडापची वाहने घुसवुन प्रवासी वाहतूक केली जात आहे. हा संप मिटल्यानंतर वडापवाल्यांना आगारांमध्ये आरटीओ अधिकारी येऊन देणार का? आणि वडाप वाहतूक अवैध आहे अशा पद्धतीच्या पावत्या जर आरटीओंनी फाडल्यास त्यांच्या गाड्या फिरून देणार नाही.

माजी मंत्री, आमदार सदाभाऊ खोत.

loading image
go to top