एसटी कर्मचाऱ्यांचा संप दोन महिने का लांबला?; शरद पवारांनी सांगितलं कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Worker Strike
एसटी कर्मचाऱ्यांचा संप दोन महिने का लांबला?; शरद पवारांनी सांगितलं कारण

एसटी कर्मचाऱ्यांचा संप दोन महिने का लांबला?; शरद पवारांनी सांगितलं कारण

मुंबई : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Employee) संप दोन महिने का लांबला? याचं कारण महाविकास आघाडी सरकारचे (MVA) मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिलं. यापूर्वी अशी परिस्थिती कधीही उद्भवली नव्हती असंही यावेळी पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत एसटी कृती समितीची बैठक पार पडली. यामध्ये २२ एसटी कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (ST workers strike strech for two months Sharad Pawar told reason behind it)

हेही वाचा: शरद पवारांनी शब्द दिलाय; कामावर या! कृती समितीचे ST कर्मचाऱ्यांना आवाहन

पवार म्हणाले, "प्रवाशी महत्वाचा हाच सुरुवातीपासून आपला दृष्टीकोन होता. कामगार संघटना आणि त्यांचे सर्व सहकारी वर्षानुवर्षे एखाद्या संघटनेच्या कामगारांच्या हिताची जपवणूक करण्यासाठी वेळ देतात, संघर्ष करतात. पण पहिल्यांदा मी हे असं बघितलंय की, कर्मचारी म्हणत आहेत की, आम्ही संघटनांचं ऐकणारच नाही. आपल्या या भूमिकेच्या संदर्भात कर्मचाऱ्यांच्या मानत बहुतेक संभ्रम झाला असावा, त्यामुळं त्यांना अपक्षेत प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळंच खरतर हे दोन महिने वाया गेले. यापूर्वी अशा प्रकारे दीर्घकाळ संप सुरु राहण्याची कधीही वेळ आली नव्हती."

हेही वाचा: 'सदावर्तेंच्या आक्रस्ताळेपणामुळे ST कर्मचाऱ्यांची रोजीरोटी बंद होण्याची वेळ'

मी गेल्या ३०-४० वर्षांमध्ये एसटी कामगारांच्या अशा प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी माझी अनेकदा उपस्थिती असायची. तेव्हा अनेकदा हे बघितलंय की, कामगारांचा दृष्टीकोन एसटीबद्दल आणि प्रवाशांबद्दल विधायकच असतो. त्यांच्या काही मागण्या असल्या तरी त्यात काही चुकीच नाही. पण या मागण्या मांडत असताना कुठंपर्यंत जावं याचं तारतम्य आजवर कामगार संघटनांनी महाराष्ट्रात ठेवलं आहे. आता यालाच अनुसरुन कामगार संघटनांनी भूमिका घेतल्याचा मला आनंद आहे, असंही यावेळी शरद पवार म्हणाले.

सदावर्तेंना हटवलं!

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची कोर्टात बाजू मांडणारे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना हटवण्यात आल्याचं यावेळी एसटी कृती समितीचे सदस्य अजय गुजर यांनी सांगितलं. तसेच त्याच्या जागी आता नव्या वकिलांची नेमणूक करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Maharashtra News
loading image
go to top