"ST कर्मचाऱ्यांना कामावर यायचं पण भाजप कार्यकर्ते येऊ देत नाही" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Parab

"ST कर्मचाऱ्यांना कामावर यायचं पण भाजप कार्यकर्ते येऊ देत नाही"

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. एसटी महामंडळाचं (MSRTC) राज्य शासनात विलीणीकरण करावं ही मागणी घेऊन सुरु असलेल्या या या आंदोलनाने आता तीव्र स्वरुप धारण केलं असून, कर्मचाऱ्यांनी सर्व महाराष्ट्रातील गाड्या आगारावर उभ्या करत चक्काजाम केला आहे. त्यातच आता राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. एसटीच्या काही कर्मचाऱ्यांना कामावर यायचं आहे, मात्र त्यांना भाजप कार्यकर्ते येऊ देत नाहीये असा आरोप अनिल परब यांनी केलाय.

हेही वाचा: प्रसिद्धीसाठी कंगना रणौतचा वरचा मजला रिकामा - निलम गोऱ्हे

परिवहन मंत्री अनिल परब यांनी कामगारांना कामावर येण्याचं आवाहन केलं असून, त्यांना संरक्षण देखील दिलं जाईल असं परब यांनी सांगितलं आहे. अनेक कामगारांना कामावर यायचंय मात्र त्यांना भाजप कार्यकर्ते येऊ देत नाही असंही ते पुढे म्हणाले आहे. विलीणीकरणाची मागणी एक-दोन दिवसांत होत नाही, त्यासाठी वेळ लागत असतो, हा वेळ त्यांनी आंदोलनात वाया घालवू नये असंही ते पुढे म्हणाले आहेत.

हेही वाचा: पुण्यात ईडीचे 7 छापे; नवाब मलिकांच्या खात्यासंबंधी चौकशीला वेग

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक ठिकाणी प्रवाशांची गैरसोय होताना दिसतेय. त्यामुळे शासनाने खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक कऱण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांवर निलंबणाची कारवाई देखील कऱण्यात आली. त्यानंतर आता कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन आता तीव्र होताना दिसतं आहे.

loading image
go to top