राज्यातील लाखो सातबारा उताऱ्यांवर चुकीच्या नोंदी

In the state of1 Lakh 25 thousand Satbara is wrong
In the state of1 Lakh 25 thousand Satbara is wrong

पुणे : डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत भूमी अभिलेख विभागाने सातबारा उतारा संगणकीकरणाचे काम हाती घेतले होते. संगणकीकरण करताना राज्यातील बिनशेती जमिनीच्या एक लाख 25 हजार सातबाऱ्यावरील क्षेत्राचे एकक चुकीचे पडले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तातडीने ते दुरुस्त करून घ्यावे, असे आदेश विभागाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  
 

"डिजिटल इंडिया'तंर्गत भूमी अभिलेखांने आधुनिकीकरण कार्यक्रमाअंतर्गत ई-फेरफार प्रणालीतून अचूक सातबारा उतारा व खाते उतारा देण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हस्तलिखित पद्धतीने सातबारा उतारा लिहिताना शेत व बिनशेती जमिनीचे क्षेत्र हे चौरस मीटरमध्ये नोंदविला जात होते. परंतु 2002 मध्ये बिनशेती सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण करताना त्यावरील क्षेत्राची नोंद आर चौरस मीटरमध्ये करावी, असे आदेश राज्य सरकारने दिले होते. प्रत्यक्षात मात्र संगणकीकरण करताना बिनशेती सातबारा उताऱ्यातील क्षेत्र आर चौरस मीटर या एकक ऐवजी चौरस मीटर मध्ये नोंदविले गेले असल्याचे लक्षात आले आहे. असे सुमारे एक लाख 25 हजार सातबारा उतारा राज्यात असल्याचे लक्षात आले आहे. 


पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वीस हेक्‍टर पेक्षा अधिक शेती क्षेत्र असलेल्या, तसेच 99 आर पेक्षा बिनशेती क्षेत्र जास्त असलेल्या सातबारा उताऱ्यांसाठी हे आदेश देण्यात आले होते. परंतु ते अद्यापही दुरुस्त न झाल्याने या चूक तातडीने दुरुस्त करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने यापूर्वीही महसूल विभागाला कळविले होते. मात्र ते अद्याप दुरुस्त झालेले नाही. त्यामुळे या सर्व जागांचे व्यवहार थांबविण्यात आले आहेत. 

या चुकीमुळे काय होऊ शकते 
मोठ्या क्षेत्रफळाच्या ज्या जमिनी आहेत. त्यांच्यावरील एकक चुकल्यामुळे प्रत्यक्ष जागेवर असलेले क्षेत्र आणि सातबारा उताऱ्यावर असलेले क्षेत्र यामध्ये तफावत निर्माण झाली आहे. अशा जमिनींचे व्यवहार झाल्यास आणि त्यांची नोंद घेताना मोठी चूक होऊ शकते. परिणामी नागरिकांची त्यातून फसवणूक होऊ शकते. त्यामुळे 20 हेक्‍टरवरील शेत जमिनींच्या आणि 99 हेक्‍टरपेक्षा बिनशेतीच्या सातबारा उताऱ्यावरील क्षेत्रासाठी आर चौरस मीटर दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


संगणकीकरण करताना बिनशेतीच्या मोठ्या क्षेत्रफळाच्या जागांची नोंद करताना आर चौरस मीटर मध्ये करण्याचे आदेश राज्य सरकारने यापूर्वीच काढले आहे. परंतु काही सातबारा उताऱ्यांवर ते चौरस मीटर मध्ये क्षेत्राची नोंद घातली गेली असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या चुका दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 
- रामदास जगताप ( राज्याचे ई-फेरफार प्रकल्प समन्वयक) 

पुण्यात एका हॉस्पिटलवर दगडफेक; कारण ऐकाल तर व्हाल थक्क!

-राज्यात 22 कोटीहून अधिक सातबारा उतारे 
-99 टक्के सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण पूर्ण 
-1 लाख 25 हजार सातबारा उताऱ्यावर क्षेत्रात चुका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com