पुण्यात एका हॉस्पिटलवर दगडफेक; कारण ऐकाल तर व्हाल थक्क!

 Pune Stone pelting at Rising Hospital in Kharadi
Pune Stone pelting at Rising Hospital in Kharadi
Updated on

रामवाडी : खराडी येथील रायझिंग मेडीकेअर हॉस्पिटलवर एका इसमाने सोमवारी दुपारी दगड फेक केल्याने हॉस्पिटलचे अर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. हॉस्पिटलवर दगड फेक करणाऱ्या इसमावर चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

खराडी येथील या खाजगी हॉस्पिटलमध्ये सध्या कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे. श्वसनाचा त्रास होणाऱ्या रुग्णांकरिता ऑक्सिजन सिलेंडरची आवश्यकता असते. यासाठी ऑक्सिजन सिलेंडरची गरज असते. बाहेरून मागवलेलं ऑक्सिजन सिलेंडर घेऊन येणाऱ्या टेम्पोची  दिवसातून चार ते पाच वेळा फेऱ्या होत असतात. काल दुपारी हॉस्पिटलच्या पाठीमागच्या बिल्डींगमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशाने ऑक्सिजन सिलेंडर घेऊन आलेल्या टेम्पोवर कुंडी फेकल्याने टेम्पोचे नुकसान झाले. परंतु सिलेंडर उतरवणारे हॉस्पिटलचे कर्मचारी सुदैवाने वाचले. त्यानंतर पहिल्या मजल्यावरील रहिवाशांने हॉस्पिटलच्या खिडक्यावर दगड फेक केल्याने खिडक्यांच्या  काचा फुटल्या गेल्या आहेत. 



रायझिंग मेडीकेअर हॉस्पिटलच्या डॉ. नी चंदननगर पोलिस स्टेशन येथे दगडफेक करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे असे चंदननगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके यांनी सांगितले.

गणेशोत्सवात 'या' चार दिवशी ध्वनीवर्धक रात्री बारापर्यंत सुरू राहणार; पुणे पोलिसांनी केले जाहीर!​

''जूनपासुन आमच्या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्ण उपचार घेतात. काहींना श्वसनाचा त्रास होतो अशा वेळी ऑक्सिजन सिलेंडरची गरज असल्याने सिलेंडरची हॉस्पिटलमध्ये आवश्यकता अधिक असते त्यामुळे दिवसातून तीन चार फेऱ्या टेम्पोच्या होत असतात. मोकळा सिलेंडर गाडीत ठेवणे भरलेला उतरवणे यामुळे थोडाफार आवाज होतो. पण काल येथील रहिवाशीवरून कुंडी टेम्पोवर फेकली सुदैवानं आमचे हॉस्पिटलचे कर्मचारी वाचले आहेत. पण, हॉस्पिटलवर दगड फेक करून खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.''
- डॉ. श्वेता भारती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune citizens can now suggest development projects for the PMC's 2027–28 Budget. Proposals can be submitted until August 31.
Despite a civic notice, mud from a construction site once again spread across Rajabahadur Mill Road in Pune, forcing the fire brigade to clean the stretch after vehicles skidded.
Pune Mayor Manjusha Nagpure claims the city has fewer potholes this monsoon than last year, even as road repair work continues across the city.
Land Acquisition
Marathi News Esakal
www.esakal.com