राज्य बोर्डाचे विद्यार्थी अन्य बोर्डाला टक्कर देणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

मुंबई - राज्यातील सहावी ते दहावीच्या अभ्यासक्रमात योग्य पद्धतीने टप्प्याटप्प्याने बदल करण्यात आला असून, त्यामुळे राज्य बोर्डाचे विद्यार्थी "सीबीएसई' आणि "आयसीएसई' बोर्डांच्या विद्यार्थ्यांना टक्कर देतील, असा विश्‍वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज व्यक्त केला. 

मुंबई - राज्यातील सहावी ते दहावीच्या अभ्यासक्रमात योग्य पद्धतीने टप्प्याटप्प्याने बदल करण्यात आला असून, त्यामुळे राज्य बोर्डाचे विद्यार्थी "सीबीएसई' आणि "आयसीएसई' बोर्डांच्या विद्यार्थ्यांना टक्कर देतील, असा विश्‍वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज व्यक्त केला. 

दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाची तोंडओळख दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या पुस्तकांचे प्रकाशन विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. नवी पुस्तके कशी असतील? अभ्यासक्रम कसा असेल? याबाबतची उत्सुकता अनेक दिवसांपासून होती. या पार्श्‍वभूमीवर नवीन पुस्तकांची तोंडओळख करून देण्याबरोबर पाठ्यपुस्तकांचे स्वरूप समाजावून सांगण्यात आले. दहावीच्या प्रत्येक पुस्तकाला क्‍यूआर कोड आहेत. त्याचा उपयोग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यालाही होईल, अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली. यासह दहावीत अध्ययन निष्पती हा पॅटर्नही राबवण्यात आला आहे. असे पॅटर्न अमलात आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. कार्यक्रमाला बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर, विवेक गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. 

तरीही माझ्यावर टीका 
शिक्षण पद्धतीत सकारात्मक बदल घडवत असतानाही सर्वांत अधिक टीकेचा धनी ठरल्याची खंत विनोद तावडे यांनी व्यक्त केली. शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी घोकमपट्टी नसावे. यासाठी "ओपन बुक एक्‍झाम सिस्टिम'च्या माध्यमातून एका प्रश्‍नाला अनेक उत्तरांची पद्धत आवश्‍यक असल्याचे तावडे म्हणाले. ही पद्धती अमलात आणल्यानंतर शिक्षकांना त्रास होईल. त्यानंतर पुन्हा वाद निर्माण होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

Web Title: State Board students will compete with other boards