Cabinet Meeting : राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 17 महत्त्वाचे निर्णय

Cabinet Meeting News : शनिवारी दुपारी ३ वाजल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. त्यापूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये १७ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत.
Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar
Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawaresakal

Cabinet Meeting News : शनिवारी दुपारी ३ वाजल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. त्यापूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये १७ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या शनिवारच्या बैठकीमध्ये सरकारने राज्य पोलिस दलामध्ये AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात येणार आहे. यासह संस्कृत, तेलुगू आणि बंगाली साहित्य अकादमी स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

यासह हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार करण्यासाठी रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली "मॅनहोलकडून मशीनहोलकडे" ही योजना राबविण्यात येणार आहे. तसेच संगणक गुन्हे तातडीने निकाली काढण्यासाठी सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार येणार आहे.

Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar
Anuradha Paudwal joins BJP: सुप्रसिद्ध 'आवाज' आता भाजपसोबत; अनुराधा पौडवाल यांनी घेतलं कमळ हाती

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी

( उद्योग विभाग)

तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार

( वैद्यकीय शिक्षण विभाग)

मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास. दंड सुद्धा वाढविला

( गृह विभाग)

१३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता.

( विधि व न्याय)

संस्कृत, तेलुगू, बंगाली साहित्य अकादमी स्थापणार

(सांस्कृतिक कार्य)

शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण

(सांस्कृतिक कार्य)

विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ. ५० कोटी भागभांडवल

( इतर मागास)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ.

( पशुसंवर्धन विभाग)

हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार. रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली "मॅनहोलकडून मशीनहोल" कडे योजना

( सामाजिक न्याय विभाग)

संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार

( गृह विभाग)

राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार

( गृह विभाग)

ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ. ५० कोटी अनुदान

( परिवहन विभाग)

Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar
SEBI: सेबीने नवा नियम केला लागू, परदेशी गुंतवणूकदारांनाही दिलासा; शेअर बाजारात काय बदल होणार?

भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप

( महसूल विभाग)

संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार. गुन्ह्यांची वेगाने उकल करणार

( गृह विभाग)

वृद्ध साहित्यिक व कलाकारांना ५ हजार रुपये मानधन

( सांस्कृतिक कार्य)

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी 20 कोटी अतिरिक्त निधी मंजूर

( सामान्य प्रशासन विभाग)

श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित

( महसूल व वन)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com