राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती | Uddhav Thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑनलाईन उपस्थिती होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एच. एन रिलायन्स रुग्णालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.

उद्धव ठाकरेंवरील शस्त्रक्रीयेमुळे गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठक होऊ शकली नव्हती. गुरुवारी ही बैठक पार पडली. राज्यासमोरील काही प्रलंबित प्रश्नांवर बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. बैठकीच्या सुरूवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, या आजारपणात आपण सर्व जण सहकार्य करीत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली फिजीओथेरपी व्यवस्थित सुरू आहे.

हेही वाचा: हिवाळी अधिवेशन मुंबईत! २२ ते २९ डिसेंबरला होणार अधिवेशन

बैठकीत चर्चेचे विषय

  • परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी संपासंदर्भात राज्य शासनाने उचललेल्या पावलांची माहिती मंत्रीमंडळास दिली.

  • युरोपमध्ये कोविड परिस्थिती बिकट होत असून आपण देखील महाराष्ट्रात पुरेशी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे, कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांत लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच चाचण्या वाढवाव्यात. कोविडचा धोका पूर्णपणे गेलेला नाही त्यामुळे आरोग्याचे नियम पाळण्यासाठी सर्वानी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत यावर चर्चा झाली.

loading image
go to top