Duplicate Voter Detection : राज्य निवडणूक आयोग संभाव्य दुबार मतदार कशाच्या आधारावर ठरवणार?

State Election Commission on Duplicate Voter : जाणून घ्या, राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी नेमकी काय दिली माहिती?
  State Election Commission

State Election Commission

Sakal

Updated on

how to identifies duplicate voters : राज्य निवडणूक आयोगाने आज(मंगळवार) पत्रकारपरिषद घेत नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. याचबरोबर मीडियाच्या विविध प्रश्नांना उत्तरही दिली. याप्रसंगी दुबार मतदारांच्या मुद्द्यावर अधिक जोर दिला गेला, त्यावर निवडणूक आयोगाने नेमक्या काय उपोययोजना केल्या आहेत, हे देखील सांगितले.

 राज्य निवडणूक आयोगाने एक टूल तयार केलेलं आहे. त्या टूलच्या आधारे संभाव्य दुबार मतदार आम्ही आधीच मतदार यादीत डबल स्टार मार्क केलेलं आहे. हेच टूल महापालिका, जिल्हापरिषदांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरलं जाणार आहे.

ज्या मतदाराच्या नावासमोर डबलस्टार आलेला आहे आणि जर त्याने काहीही प्रतिसाद दिलेला नाही. तर त्याची सर्व मतदार केंद्रावर डबलस्टार अशी नोंद होईल. त्याच्याकडून एक जाहीरनामा लिहून घेतला जाईल, की या मतदारकेंद्राव्यतिरिक्त किंवा या मतदानानंतर तो दुसऱ्य मतदार केंद्रावर मतदान करणार नाही. केवळ एकाच मतदार केंद्रावर त्याला मतदान करता येईल.

  State Election Commission
Duplicate Voters List : दुबार मतदाराच्या नावापुढे डबल स्टार, नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी आयोगाने उचलले मोठे पाऊल, कशी घेणार दक्षता ?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज(मंगळवार) राज्य निवडणूक आयोगाने पत्रकारपरिषद घेतली. २४६ नगरपरिषद, ४२ नगरपंचायती निवडणुकीबाबत ही पत्रकारपरिषद झाली. यावेळी विशेष करून दुबार मतदारासंदर्भात निवडणूक आयोगाने घेतलेल्या दक्षतेबाबत सविस्तर माहिती दिली गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com