

State Election Commission announces revised expenditure limits for candidates contesting in municipal and town council elections to ensure fair campaigning.
esakal
State Election Commission announces revised expenditure limits for candidates : राज्य निवडणूक आयोगाने नगपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी निकाल असणार आहे. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त वाघमारे यांनी विविध मुद्दे यावेळी स्पष्ट केले आणि मीडियाच्या विविध प्रश्नांवर उत्तरही दिली.
यावेळी निवडणूक आयोगाने नगपरिषद, नगरपंचात उमेदवारांची खर्च मर्यादा वाढवल्याची माहिती दिली. यानुसार अ वर्ग नगरपरिषद अध्यक्षपदासाठी १५ लाख तर सदस्यपदासाठी पाच लाख रुपये, ब वर्ग नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी ११ लाख २५ हजार, तर सदस्यपदासाठी ३ लाख ५० हजार रुपये असणार आहे.
याशिवाय क वर्ग नगरपरिषद अध्यक्षपदासाठी ७ लाख ५० हजार, तर सदस्यपदासाठी २ लाख ५० हजार रुपये आणि नगरपंचायतीच्या अध्यक्ष पदासाठी ६ लाख आणि सदस्यपदासाठी २ लाख २५ हजार अशी खर्च मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे.
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायती निवडणुकीबाबत ही पत्रकारपरिषद झाली. यावेळी विशेष करून दुबार मतदारासंदर्भात निवडणूक आयोगाने घेतलेल्या दक्षतेबाबत सविस्तर माहिती दिली गेली.यानुसार राज्य निवडणूक आयोगाने एक टूल तयार केलेलं आहे. त्या टूलच्या आधारे संभाव्य दुबार मतदार आम्ही आधीच मतदार यादीत डबल स्टार मार्क केलेलं आहे. हेच टूल महापालिका, जिल्हापरिषदांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरलं जाणार आहे.
तसेच, ज्या मतदाराच्या नावासमोर डबलस्टार आलेला आहे आणि जर त्याने काहीही प्रतिसाद दिलेला नाही. तर त्याची सर्व मतदार केंद्रावर डबलस्टार अशी नोंद होईल. त्याच्याकडून एक जाहीरनामा लिहून घेतला जाईल, की या मतदारकेंद्राव्यतिरिक्त किंवा या मतदानानंतर तो दुसऱ्य मतदार केंद्रावर मतदान करणार नाही. केवळ एकाच मतदार केंद्रावर त्याला मतदान करता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.