MNS Chief Raj Thackeray expresses anger on press conference of State Election Commission.
esakal
Raj Thackeray Angry Reaction: ‘’निवडणूक आयोगाची पत्रकारपरिषद पाहून, तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता...’’
MNS Chief Raj Thackeray Angry on State Election Commission : राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमाची आज पत्रकारपरिषद घेऊन घोषणा केली. यावेळी मीडियाने विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नही विचारले. ज्यावर राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी उत्तर देत भूमिका स्पष्ट केली. आता या पत्रकारपरिषदेवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. राज ठाकरेंनी एक्सवर पोस्ट करून निवडणूक आयोगाच्या पत्रकारपरिषदेवर संताप व्यक्त केला आहे. शिवाय, निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुल असल्याची खात्री पटल्याचंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं आहे? –
राज ठाकरेंनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय की, ‘’आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता १०० टक्के खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे...’’
याशिवाय, ‘’दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय?’’ असं राज ठाकरेंनी विचारलं आहे.
याचबरोबर ‘’महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा... तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल... बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन...’’ असंही राज ठाकरेंनी म्हटलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

