

Voting Marker Row Maharashtra EC Press Conference
ESakal
आज महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र अशातच यात मतदान शाई नाहीतर मार्करचा वापर होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे बोगस मतदान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी गुरुवारी महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांमध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गैरप्रकार होत असल्याचा आरोप केला आहे. यावर आता महाराष्ट्र निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत उत्तर दिले आहे. यात त्यांनी अनेक खुलासे केले आहेत.