Exam
मुंबई : राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास अडचण येत असल्याने २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य परीक्षा मंडळाने घेतला आहे. यासोबतच दहावीच्या परीक्षेत १७ नंबरचा अर्ज भरून खासगीरीत्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.