राज्यातील वन अधिकाऱ्यांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 डिसेंबर 2018

महसूल व वन विभागतर्फे राज्यातील भारतीय वनसेवेत असलेल्या 41 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील पूर्व आणि पश्‍चिम वन विभागाचे उप-वनसंरक्षक डॉ. शिवबाला एस. आणि उप-वनसंरक्षक टी. ब्यूला एलील मती यांची बदली झाली आहे. उप-वनसंरक्षक अनिल अंजनकर यांना वनसंरक्षकपदी पदोन्नती देण्यात आली.

नाशिक : महसूल व वन विभागतर्फे राज्यातील भारतीय वनसेवेत असलेल्या 41 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील पूर्व आणि पश्‍चिम वन विभागाचे उप-वनसंरक्षक डॉ. शिवबाला एस. आणि उप-वनसंरक्षक टी. ब्यूला एलील मती यांची बदली झाली आहे. उप-वनसंरक्षक अनिल अंजनकर यांना वनसंरक्षकपदी पदोन्नती देण्यात आली.

महसूल व वन विभागतर्फे राज्यातील भारतीय वनसेवेत असलेल्या प्रधान मुख्य वनसंरक्षक, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, मुख्य वनसंरक्षक, वनसंरक्षक आणि उपसंरक्षक अशा पदाच्या 41 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात नाशिक पश्‍चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक टी. ब्युला यांची अकोट येथे उपवनसंरक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या जागी गडचिरोली येथील उपवनसंरक्षक एस. बी. फुले यांची नियुक्ती झाली आहे. त्याचबरोबर पूर्व वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. शिवबाला एस. यांची मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथे उपवनसंरक्षकपदी बदली झाली. त्यांच्या जागेवर सिरोंचा येथील उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशिक वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांना पदोन्नती देऊन वन्यजीव वनसंरक्षकपदी पदस्थापना देण्यात आली आहे. 

Web Title: State Forest Officers Transfer