मुंबई - पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या राज्यातील पर्यटकांना विमानाने परत आणण्यासाठी राज्य सरकारने सुमारे ६४ लाख रुपये खर्च केले असून पुण्यातील गिरिकंद ट्रॅव्हल्स या खासगी कंपनीला हे काम देण्यात आले होते. याबाबतच्या खर्चाला वित्त विभागाने नुकतीच मंजुरी दिली आहे.