सरकारचा अर्थसंकल्प लोकानुनयाचा?

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 जून 2019

राज्य सरकारच्या अखेरच्या आणि अर्थसंकल्पी अधिवेशनाला उद्यापासून (ता. १७) सुरवात होत आहे. त्यास फडणवीस सरकार नव्या चमूसह सामोरे जाणार आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी सादर होणारा अर्थसंकल्प हा मतांची पेरणी करणारा लोकानुनयी असेल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.

मुंबई - राज्य सरकारच्या अखेरच्या आणि अर्थसंकल्पी अधिवेशनाला उद्यापासून (ता. १७) सुरवात होत आहे. त्यास फडणवीस सरकार नव्या चमूसह सामोरे जाणार आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी सादर होणारा अर्थसंकल्प हा मतांची पेरणी करणारा लोकानुनयी असेल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. 

विविध वर्गांतील समाजावर सवलतींची खैरात करणाऱ्या अर्थसंकल्पात १० समाजसेवी योजना मांडण्यात येणार आहेत. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जे निर्भेळ यश मिळाले आहे त्याचा आनंद आहे, पण विरोधक म्हणतात तसा उन्माद नाही. जनतेची कामे करण्यासाठी आम्ही राजकारणात आहोत, त्याच दिशेने काम करू. 

‘उद्धवजी सांगतात ते करतो’
शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देऊनही त्यांनी ते स्वीकारले नाही का, या प्रश्‍नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की शिवसेनेने कोणते निर्णय का घेतले याचे उत्तर आम्ही देऊ शकत नाही. उद्धवजी जे सांगतात ते आम्ही अंमलात आणतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Government Budget