उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्याच्या घरी आणि कार्यालयात पेपर बंद, खर्च कमी करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; वृत्तपत्र विक्रेत्यांचा विरोध

Ministers Offices Printed Newspapers Closed: उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्याच्या घरी आणि कार्यालयात पेपर बंद केले जाणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यावर वृत्तपत्र विक्रेत्यांनी विरोध केला आहे.
Printed Newspapers Closed to Ministers Offices

Printed Newspapers Closed to Ministers Offices

ESakal

Updated on

मुंबई : मुख्यमंत्री वगळता अन्य मंत्र्यांची कार्यालये तसेच त्यांच्या शासकीय निवासस्थानावर येणारी छापील वृत्तपत्रे किंवा नियतकालिके बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्याऐवजी मंत्र्यांनी वृत्तपत्रांचे किंवा नियतकालिकांचे ऑनलाइन वर्गणीदार व्हावे. तसेच यासाठीचा खर्च संबंधित मंत्र्याने त्यांच्या संबंधित विभागाकडून करावा, असे आदेश सरकारने काढले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com