एसटीत साठीवरून आडकाठी !

ब्रह्मा चट्टे
शनिवार, 14 जुलै 2018

मुंबई : राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 65 वरून 60 केली असल्याची घोषणा केली आहे. मात्र एसटीत साठीवरून आठकाठी सुरू आहे. सरकारचा हा आदेश एसटी महामंडळाला अद्याप न मिळाल्याने तिकीट दराच्या सवलतीसाठी एसटीत जुनीच वयोमर्यादा ग्राह्य धरण्यात येत आहे. 60 वयाच्या नागरिकांना सवलत मिळायला काही दिवस लागणार असल्याने एसटी मध्ये कंडक्टर आणि ज्येष्ठ प्रवासी यांच्यात वादावादी होत आहे.

सामाजिक न्याय विभागाने ज्येष्ठ नागरिकांसाठी धोरण जाहीर केले आहे. 

या धोरणानुसार सर्व योजनांच्या लाभासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची मर्यादा 65 वरून 60 वर्षे केली आहे. या निर्णयाची चोख अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व विभागांना सक्तीचे निर्देश दिले असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी बुधवारी (ता.11) विधानसभेत दिली. त्यानंतर आज सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी मात्र एसटी महामंडळाने ज्येष्ट नागरिकाच्या वय 65 च ग्राह्य धरलं आहे. निवृती नंतर देव-दर्शनाच्या निमित्ताने धार्मिक पर्यटनासाठी ज्येष्टांचा अधिक कल असतो. 

त्यासाठी एसटीचा प्रवास त्यांना सवलतीमध्ये व सोईस्कर असतो. शासन एसटीच्या माध्यमातून समाजातील 24 दुर्बल घटकांना 30 टक्के पासून 100 टक्के पर्यंत तिकिट भाडयात सवलत देते. या सवलतीची रक्कम राज्य सरकार एसटी महामंडळाला देते. ज्येष्ट नागरिकांना एसटीच्या साध्या, रातराणी (परिवर्तन) व निम-आराम (हिरकणी) बसेसमध्ये 50 टक्के, आसन श्रेणीच्या शिवशाही बसमध्ये 45 टक्के तर शयनयान श्रेणीच्या शिवशाहीमध्ये 30 टक्के तिकिट दरात सवलत मिळते. शासनाने वयोमर्यादा कमी केली असली तरी एसटीने मात्र अजूनही आपले जुनेच धोरण पुढे रेटल्याने सरकारच्या घोषणा पोकळ ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

- सन 2017-18 चे एकूण सवलत धारकांची संख्या 38 कोटी

-  त्यापैकी ज्येष्ट नागरिक 32 कोटी 57 लाख 25 हजार 

- सवलतीचे मुल्य सुमारे 574 कोटी 85 लाख 

- शासनाकडून सन 2017-18 या वर्षात एकूण सवलती मुल्यापोटी सुमारे 1383 कोटी रूपये एसटीला देणे लागते. 

ज्येष्ट नागरिकांच्या वयोमर्यादेबद्दलचा शासन निर्णय एसटीला प्राप्त झाला नाही. त्यामुळे आम्ही जुन्याच निकषाप्रमाणे सवलत ठेवली आहोत. सवलतीचे पैसे आम्हाला सरकारकडूनच मिळतात. त्यामुळे आम्हाला सरकारकडून काहीही कळवले नाही.

- रणजीतसिंह देओल, पाध्यक्ष एसटी महामंडळ

Web Title: The state government has announced the age limit for senior citizens from 65 to 60.