
नितिन बिनेकर
मुंबई : राज्यातील मद्य आणि मद्यार्क (स्पिरिट) वाहतूक आता तंत्रज्ञानाच्या कडक सुरक्षा कवचाखाली आलेली आहे. वाहतुकीदरम्यान होणारी चोरी, मार्गबदल किंवा अवैध विक्री यावर आळा घालण्यासाठी राज्य सरकारने ‘ई-लॉक’ प्रणाली लागू केली आहे. १ जुलै पासून व्यवस्था राज्यभर सुरू झाली. या यंत्रणेमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथरक्षणावर होणारा खर्च कमी झाला असून कोट्यवधी रुपयांची बचत होणार आहे. डिजिटल पद्धतीमुळे पारदर्शकता वाढून सरकारी उत्पन्नातही लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे.