Medical Recruitment : ‘वैद्यकीय’मध्ये पाच हजार जागा भरणार

नोकरभरती कंत्राटीकरणाचा राज्य सरकारचा सपाटा
medical recruitment
medical recruitmentsakal

मुंबई - राज्यात कंत्राटी भरतीवरून विरोधकांकडून राज्य सरकारला धारेवर धरले जात आहे. त्यातच आता वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामध्ये तब्बल पाच हजारांहून अधिक पदांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यास मान्यता देण्यात आल्याचे समोर आले आहे. या भरतीसाठी एका सेवापुरवठादाराचीही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात नोकरभरती कंत्राटीकरण करण्याचा राज्य शासनाने सपाटा लावल्याची चिन्हे आहेत.

संचालनालयाच्या आधिपत्याखालील २७ शासकीय वैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयांतील कुशल, अकुशल व अर्धकुशल अशी एकूण ५ हजार ५६ पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. शासकीय  नोकरभरतीला राज्यभरातून विरोध होत असताना राज्य सरकारने आता कंत्राटी तत्त्वावर पोलिस भरतीपाठोपाठ  तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, संगणक चालक आणि शिपाई भरतीची जाहिरात दिली आहे.

त्यातच वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामध्ये  तब्बल पाच हजारांहून अधिक पदांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार असल्याने राज्यातील कर्मचारी अधिकारी संघटना आणि सामाजिक व राजकीय संघटना संतप्त झाल्या आहेत.

शासनाने बाह्य स्त्रोतामार्फत पदे भरण्यासाठी नऊ पुरवठादारांचे पॅनेल नियुक्त केल्याने त्यांच्याकडूनच कंत्राटी पदे भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण विभागातील पद भरतीसाठी सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रा. लि. या सेवा पुरवठादाराची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पाच वर्षांसाठी असेल.

राज्यभरात विविध ठिकाणी कंत्राटी भरती विरोधात आंदोलने सुरू असतानाही सरकारने हा शासन निर्णय काढला आहे. आमच्या विरोधाला सरकार काडीचीही किंमत देत नाही. येत्या काळात अनेक विभागांत सरकार याप्रकारे कंत्राटी भरतीच्या जाहिराती काढण्याची शक्यता आहे.

- राज बिक्कड, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी

औषधांच्या तुटवड्यामुळे झालेले मृत्यू वेदनादायी, गंभीर व चिंताजनक आहेत. वारंवार होणाऱ्या घटनांमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी व यात दोष असलेल्यांवर कठोर कारवाई करावी,

- मल्लिकार्जुन खर्गे, अध्यक्ष, काँग्रेस

नांदेडच्या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. या घटनेत जीव गमावलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत द्यावी.

- प्रियांका गांधी, सरचिटणीस, काँग्रेस

आमदारांच्या खरेदीत गुंग राहणाऱ्या महाराष्ट्रातील सत्तारूढच नेत्यांना जनतेच्या आरोग्याची पर्वा नाही. नांदेडची घटना खूपच वेदनादायी आहे. औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सरकार इतके निष्काळजी कसे राहू शकते?

- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री,दिल्ली

राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला भ्रष्टाचाराचा भस्म्या रोग झाला असून संपूर्ण यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे. राज्य सरकारने राज्यात मोफत आरोग्य सेवा सुरु केल्याचा मोठा गाजावाजा केला पण रुग्णालयात सरकार सेवा देत नसून मृत्यू देत आहे.

- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

‘मृतांच्या टाळूवरील लोणी खाणारे’ ही म्हण आपण ऐकली आहे. पण लोणी खाण्यासाठी मृत्यू घडवून आणणारे राज्यकर्ते आज महाराष्ट्रात सत्ता चालवतायेत ही महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी दुर्दैवी अशी गोष्ट आहे.

- आदित्य ठाकरे,युवानेते, ठाकरे गट

शासकीय रुग्णालयांतील रिक्त जागा भरणार : मुश्रीफ

नांदेड - सद्य:स्थितीत राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेसे मनुष्यबळ नाही. आगामी काळात सर्व रिक्त पदे भरली जातील. नांदेड येथील शासकीय रुग्णालयात झालेली घटना दुर्दैवी आहे. त्यामुळे वर्ग एक व दोनची रिक्त पदे या महिनाअखेरपर्यंत भरली जातील. वर्ग तीन आणि चारची पदे भरण्यासाठी अधिष्ठातांना निर्देश दिले आहेत.

औषध खरेदीचे अधिकारही अधिष्ठातांना दिले आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार प्रताप पाटील चिखलीकर आदी उपस्थित होते. मुश्रीफ म्हणाले, की येथील शासकीय रुग्णालयात मनुष्यबळाअभावी रुग्णांची हेळसांड होत आहे. चोवीस तासांमध्ये मृत्यू झालेल्या प्रत्येक प्रकरणाची चौकशी केली जाणार असून, समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com