राज्य मंत्रिमंडळाचा शनिवारी विस्तार?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाच्या अखेरच्या विस्ताराला मुहूर्त मिळाल्याची चर्चा असून, येत्या शनिवारी म्हणजेच १३ ऑक्‍टोबरला राज्य मंत्रिमंडळात खांदेपालट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाच्या अखेरच्या विस्ताराला मुहूर्त मिळाल्याची चर्चा असून, येत्या शनिवारी म्हणजेच १३ ऑक्‍टोबरला राज्य मंत्रिमंडळात खांदेपालट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्य मंत्रिमंडळात सध्या २५ कॅबिनेट आणि १६ राज्यमंत्री आहेत. त्यात शिवसेनेच्या पाच कॅबिनेट, तर सात कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे. शिवसेनेच्या कोट्यातील एक जागा अजूनही भरायची आहे. भाजपच्याही तीन जागा भरायच्या आहेत. राज्यातील फडणवीस सरकारची मुदत आणखी एक वर्ष आहे. त्याआधी मार्च-एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकाही अपेक्षित आहेत.  अशावेळी मंत्रिमंडळाचा हा संभाव्य विस्तार व खांदेपालट अखेरचा ठरण्याची शक्‍यता आहे. रविवारीच मुख्यमंत्री राजधानी दिल्लीत गेले होते. तेथे त्यांनी पक्षाच्या काही नेत्यांशी चर्चा केल्याचे कळते.

Web Title: State Mantrimandal Expansion