राज्यमंत्र्यांना बंपर लॉटरीचा लाभ

प्रशांत बारसिंग
सोमवार, 6 जानेवारी 2020

महाविकास आघाडीच्या राज्य मंत्र्यांच्या वाट्याला प्रत्येकी पाच ते सहा खाती मिळाल्याने ते सर्व जण खूष आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात एकूण दहा मंत्र्यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये राष्ट्रवादीला चार, शिवसेनेला चार, तर काँग्रेसला दोन राज्यमंत्रिपदे मिळाली आहेत. खातेवाटपात या दहा राज्यमंत्र्यांकडे एकूण ५८ खाती देण्यात आली आहेत.

प्रत्येकाला पाच-सहा खाती
मुंबई - महाविकास आघाडीच्या राज्य मंत्र्यांच्या वाट्याला प्रत्येकी पाच ते सहा खाती मिळाल्याने ते सर्व जण खूष आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात एकूण दहा मंत्र्यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये राष्ट्रवादीला चार, शिवसेनेला चार, तर काँग्रेसला दोन राज्यमंत्रिपदे मिळाली आहेत. खातेवाटपात या दहा राज्यमंत्र्यांकडे एकूण ५८ खाती देण्यात आली आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ३२ कॅबिनेट, तर दहा राज्यमंत्र्यांचा समावेश झाला आहे. मंत्रिमंडळातील राज्यमंत्र्यांची संख्या कमी असल्याने प्रत्येकाला अनेक खात्यांची लॉटरी लागली आहे. राज्यमंत्र्यांना अधिकारही देण्यात येणार आहेत. 

भाजपच्या नेत्याची मनसेला ऑफर; शिवसेनेची जागा भरून काढणार?

काँग्रेस आघाडीचे सरकार असतानाही राज्यमंत्र्यांना अधिकार दिले होते. तसेच ज्या खात्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार होता, त्या खात्याच्या राज्यमंत्र्याला मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित राहण्याची काँग्रेस आघाडी सरकारमध्ये परंपरा होती. मात्र २०१४ मध्ये झालेल्या सत्तांतरात राज्यमंत्र्यांना कोणतेही अधिकार देण्यात आले नव्हते. तसेच त्यांना मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहण्याचीही परवानगी देण्यात आली नव्हती. आता महाविकास आघाडीच्या सरकारमधील राज्यमंत्र्यांना अनेक खात्यांची लॉटरी लागली असून, त्यांना अधिकारही देण्यात येणार आहेत. तसेच हे राज्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार असल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state Ministers benefit from bumper lottery