राज्यात मानसिक उपचारांची दरवर्षी दोन लाख जणांना गरज

Mental-illness
Mental-illness

पुणे - राज्यात दरवर्षी मानसिक आजारांवर उपचार घेण्याची गरज दोन लाखांहून अधिक जणांना भासते. येरवडा, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर या चार प्रादेशिक मनोरुग्णालयात हे रुग्ण उपचार घेतात. राज्यातील ३४ जिल्ह्यात मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत बाह्यरुग्ण विभागात तीन लाख ३१४९ जणांनी औषधोपचार व समुपदेशन घेतले आहेत. आंतररुग्ण विभागात २२ हजार ७६६ जणांनी उपचार घेतले. लॉकडाउनच्या दरम्यान व कोरोनाच्या भितीमुळे राज्यभरात या रुग्णसंख्येत वाढ झाली असून त्याची माहिती संकलित करण्यात येत असल्याची माहिती येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधिक्षक डॉ. अभिजित फडणीस यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ. फडणीस म्हणाले, ‘‘राज्यातील चार मनोरुग्णालयांची पाच हजार ७०० रुग्णक्षमता आहे. त्यापैकी तीन हजार रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या पाच वर्षांत चारही रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागातून नऊ लाख रुग्णांनी औषधोपचार, समुपदेशन घेतले आहे.’’ 

प्रादेशिक मनोरूग्णायांतील मनोरूग्णांना जागतिक दर्जाचे उपचार व सोयीसुविधा मिळण्यासाठी अभ्यास समिती गठित केली आहे. या समितीच्या सदस्या व वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रचना गोस्वामी म्हणाल्या, ‘‘कोरोनाचा संसर्ग व लॉकडाउनच्या काळात राज्यभरात मानसिक आजाराचे रुग्ण वाढल्याचे दिसत आहे. त्याचा अभ्यास करण्यात येत आहे. सध्या मनोरूग्णालयात अतिशय गंभीर आजार असल्याचे रुग्ण दाखल होत आहेत.’’

रुग्णालयाच्या उपाधिक्षिका डॉ. गीता कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘रुग्णांची प्रथम कोरोना चाचणी केली जाते. स्वत व रुग्णांची घ्यावयाची काळजी बाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती आहे.’’

दहा प्रकारचे मानसिक आजार 
द्विध्रुवीय मनोविकार (स्वभावातील चढ-उतार), ऑरगॅनिक मानसिक आजार, छिन्नमनस्कता (स्क्विझोफ्रेनिया), उदासीनता, मानसिक दुर्बलता, फीट येणे किंवा अपस्मार, व्यसनाधीनता, स्मृतिभ्रंश आणि वर्तणूक, लैगिंकता आणि भटकंती यामुळे आलेले मानसिक आजार, असे दहा प्रकारचे गंभीर मानसिक आजार आहेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com