esakal | राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली; सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली; सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

एमपीएसी आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पुर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती कॅबिनेट मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.  मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील जेईई आई आणि नीटसह महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली होती.

राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली; सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - कोव्हिड 19 आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. त्यासोबतच इतर जे ई ई आणि नीट परिक्षा सुद्धा पुढे ढकलण्यात याव्या याबाबत मागण्या विद्यार्थ्यांकडून होत आहेत. आज मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील जेईई आई आणि नीटसह महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली होती. बुधवारी सायंकाळी हाती आलेल्या वृत्तानुसार आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पुर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती कॅबिनेट मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. 

काही दिवसांपुर्वीच राज्याचे पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांनी पंतप्र्धान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले होते, त्यांनी त्यांनी कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर परिक्षा पुढे ढकलण्यात याव्या अशी मागणी केली होती. या पत्राची चांगलीच चर्चा झाली होती. तसेच विद्यार्थ्यांकडूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता.

पॉलिटेक्निकच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ; या तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना भरता येणार अर्ज

आता राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पुर्व परिक्षा कोरोना संसर्ग लक्षात घेता पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात म्हटले की, कोरोनाचे संकट अद्यापही दूर झालेले नसताना, एमपीएससीची 20 सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा पुर्वपरिक्षा परिक्षा पुढे ढकलण्यात यावी. परिक्षा देणारे काही विद्यार्थी कोरोनाबाधित आहेत. काही त्यातून बरे झाले आहेत. त्यामुळे शारिरीक हानी झाल्यामुळे ते परिक्षा देण्यास असमर्थ आहेत. क्लासेस बंद आहेत, तसेच परिक्षांसाठी लागणारी पुस्तके सध्या लगेच उपलब्ध नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षितेतची भावना आहे. लॉकडाऊनमुळे दळवळणही सहज शक्य होणार नाही. त्यामुळे वयोमर्यादेच्या काठावर असलेल्या उमेदवारांचे नुकसाने होऊ नये.

मंत्री धनजंय मुंडे यांंनी या पत्रासंबधी ट्वीट केले आहे. त्यात एमपीएससीची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यात आले होते. आयोगाने आधीच राज्य सेवा आणि संयुक्त पुर्व परिक्षा पुढे ढकलली होती. तसेच उमेदवारांना केंद्र बदलून देण्याचीही सोय करून दिली होती.  परंतु विद्यार्थ्यांच्या अडचणींचा विचार करता एमपीएससीची राज्यसेवा पुर्वपरिक्षा आता पुढे ढकलण्यात आली असल्याचे कॅबिनेट मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. आयोगाचे सुधारित वेळापत्रक लवकर जाहीर करण्यात येणार आहे. 

---------------------------------------------------------------