राज्यातील सहा आमदार संसदेत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मे 2019

पराभूत आमदार
संग्राम जगताप, भाऊसाहेब कांबळे, सुभाष झांबड, के. सी. पाडवी, कुणाल पाटील, हर्षवर्धन जाधव, राणा जगजितसिंह पाटील, नामदेव उसंडी

विविध कारणांमुळे राजीनामा दिलेले आमदार
अब्दुल सत्तार, हर्षवर्धन जाधव, जयदत्त क्षीरसागर, आशिष देशमुख

राज्यातील सहा आमदार संसदेत निवडून आले आहेत, तर अन्य कारणांमुळे आणखी चार आमदारांनी राजीनामे दिले आहेत, त्यामुळे फडणवीस सरकारच्या शेवटच्या विधिमंडळ अधिवेशनात दहा आमदार गैरहजर असतील.

लोकसभा निवडणुकीत विविध पक्षांचे १४ आमदार जनमताचा कौल आजमावत होते. त्यापैकी सहा आमदार राज्यातून लोकसभा निवडणुकीत निवडून आले आहेत. पुण्यातील भाजप आमदार आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवला आहे, त्यामुळे त्यांना आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. औरंगाबादमधून ‘एमआयएम’चे आमदार इम्तियाज जलील हे संसदेवर गेले आहेत. विदर्भातील शिवसेनेचे आमदार सुरेश धानोरकर हे काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले आहेत. 

चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील, नांदेडमधील आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, हिंगोलीतील आमदार हेमंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत विजयी ठरल्याने त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Six MLA in Parliament Politics