राज्य तमाशा महोत्सव आजपासून सुरू

Lavani
Lavani

पुणे - येथे होणाऱ्या पाचदिवसीय राज्य तमाशा महोत्सवाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. आज गुरुवार (ता. १४) पासून या महोत्सवाला सुरवात होणार आहे. यासाठी सुमारे चार एकर भव्य मैदान सजविण्यात आले आहे. सलग पाच दिवस (ता. १४ ते १८ फेब्रुवारी) विविध नामवंत तमाशा फडांचा आनंद घेण्याची संधी तमाशा रसिकांना यानिमित्त मिळणार आहे.

राज्य तमाशा महोत्सवाचा मान वाघोलीला प्रथमच मिळत असल्याने या भागात उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे हा महोत्सव भव्य व्हावा यासाठी वाघोलीचे 
ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत. महोत्सवाला आवश्‍यक सुविधा पुरवण्यासाठी आज जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्‍वर कटके, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे, दादा सातव, गणेश कुटे, प्रदीप सातव, शिवदास उबाळे यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी करून ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना दिल्या.

वाघोलीतील केसनंद फाट्यावर ग्रामपंचायत मैदानावर हा महोत्सव होत आहे. त्यासाठी व्यासपीठ, कलाकारांच्या राहुट्या, मैदानाला तात्पुरत्या स्वरूपात सीमाभिंत, स्वागत कमान उभारण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. तसेच या ठिकाणी पाणी, पार्किंगची व्यवस्था, मैदानाची स्वच्छता याबाबत महोत्सवाचे समन्वयक संभाजी जाधव यांनी तयारीचा आढावा घेतला.

विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार 
तमाशा क्षेत्रासाठी योगदान दिल्याबद्दल बी. के. मोमीन कवठेकर यांना यंदाचा पुरस्कार राज्य शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने जाहीर केला आहे. शुक्रवार (ता. १५) सायंकाळी सहा वाजता पुरस्काराचे वितरण होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com