मालवाहू वाहनांच्या परवानगीसाठी 24 तास सुविधा; परिवहन आयुक्त कार्यालयाचा खुलासा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 April 2020

मालवाहतुकीच्या दरम्यान चालकांना असुरक्षीत वाटू नये, कुठे अडचण येऊ नये यासाठी ही वाहन परवानगीची सुविधा आहे. त्यासाठी कुठलेही बंधन नसून यासंदर्भात राज्य परिवहन आयुक्तांकडून दैनंदिन आढावा घेतला जात आहे.

मुंबई : देशांतर्गत मालवाहतूकीसाठी केंद्र सरकारने परवानगी दिलेली असली तरी राज्य सरकारने, केंद्राच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने राज्याच्या प्रमुख 11 चेकपोस्टवर अजूनही सुमारे 18 हजार ट्रक उभे असल्याचे वृत्त 'ई-सकाळ'ने 14 एप्रिल रोजी प्रसिद्ध केली होते.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मात्र, राज्यातील एकाही सीमा नाक्यावर मालवाहू वाहने उभी नाहीत, तर प्रत्येक मालवाहू वाहनांना परवानगी दिल्या जात असून त्यासाठी 24 तास नियंत्रण कक्षसुद्धा उघडे करण्यात आल्याचा खुलासा राज्य परिवहन आयुक्त कार्यालायाने केला आहे. 

- मोठी बातमी : राज्यात ट्रक वाहतुकीला प्रारंभ

राज्याच्या मोटार वाहन विभागाअंतर्गत येणाऱ्या 50 प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मालवाहू वाहन धारकांनी परवानगी मागितल्यास त्यांना संचारबंदीच्या कालावधीत परवाना देण्याच्या सूचना परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी 24 मार्च रोजी दिल्या आहे. त्यानूसार राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि सीमा तपासणी नाक्यावर सुद्धा मालवाहू वाहन चालकांसाठी परवाना मिळवण्यासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

- Digital Exclusive : धीरोदात्त आणि संयमी उद्धव ठाकरे..!

मालवाहतूकीचे योग्य नियोजन व्हावे, मालवाहतूकीची वाहतूक करतांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयासह राज्यातील सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये 24 तास नियंत्रण कक्ष सुद्धा सुरू केला आहे. तर राज्यात 24 मार्च ते 14 एप्रील पर्यंत 98629 मालवाहू वाहनांना ई-परवाने दिले आहे. तर राज्यासह परराज्यातील नोंदणीकृत वाहनांना, राज्यातील कोणत्याही परिवहन कार्यालयात अथवा सिमा तपासणी नाक्यावर सुद्धा परवानगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. असल्याचे ही परिवहन आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे.  

- चक दे इंडिया! सतत विरोधी भूमिका घेणाऱ्या देशांना औषधे पुरवतोय भारत!

मालवाहतुकीच्या दरम्यान चालकांना असुरक्षीत वाटू नये, कुठे अडचण येऊ नये यासाठी ही वाहन परवानगीची सुविधा आहे. त्यासाठी कुठलेही बंधन नसून यासंदर्भात राज्य परिवहन आयुक्तांकडून दैनंदिन आढावा घेतला जात आहे. तर परवानगी नसल्याने कोणत्याही प्रकारची मालवाहतूक राज्यात थांबवण्यात आली नाही. अथवा मालवाहतुकीसाठी वाहन चालकांना कोणत्याही प्रकारची सक्ती केल्या जात नसल्याचे राज्य परिवहन आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

देशात तीन मे पर्यंत 'या' 13 सेवा राहणार बंद...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Transport Commissioner Office disclosure that 24 hour facility to allow goods transport in Maharashtra