
कोरोना व्हायरसवर अजूनपर्यंत कोणतीही लस तयार होऊ शकली नाही. मात्र, एचसीक्यूचे परिणाम चांगेल आल्याने सध्या याचा वापर केला जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एचसीक्यूला गेम चेंजर म्हटले होते.
नवी दिल्ली : प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचा एक शेर आहे, 'दुश्मनी जमके करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त बन जाए तो शर्मिंदा ना हो' हा शेर भारत आणि इतर राष्ट्रांमध्ये सध्याच्या परिस्थितीला एकदम चपखल बसत आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून सतत भारत विरोधी भूमिका घेणाऱ्या देशांना आज भारत औषधाचा पुरवठा करतोय.
- बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोना या महामारीने जगभरातील अनेक देशांना आपल्या विळख्यात ओढल्याने मोठ्या प्रमाणात मानवी हानीचा सामना सर्वच देशांना करावा लागत आहे. अशा पार्श्वभूमीवर गेम चेंजर ठरणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विन (एचसीक्यू) या औषधी गोळ्यांचे उत्पादन करण्याची क्षमता भारताकडे सर्वाधिक आहे.
- मोठी बातमी - धक्कादायक ! भारतीय वटवाघुळांमध्येही सापडले कोरोना...
नुकतीच मलेशियानेही भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची मागणी केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या. कारण काही दिवसांपूर्वीच काश्मीरमधून कलम ३७० हटविण्यास आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्यास (सीएए) मलेशियाने विरोध केला होता. आता कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रमुख अस्त्र ठरत असलेल्या औषधासाठी मलेशियाने भारतापुढे हात पसरले आहेत. भारतानेही मनाचा मोठेपणा दाखवत संकटकाळात मदतीचा हात पुढे केला आहे.
भारत विरोधी भूमिका घेणारे देश
काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याप्रकरणी अनेक देशांनी भारताला विरोध केला. चीन, इराण, मलेशिया, तुर्की या देशांनी उघडपणे विरोध केला, तर ब्रिटनने छुपा विरोध केला होता. त्यानंतर सीएएलाही मलेशिया, तुर्की, बांगलादेश या देशांनी विरोध दर्शविला होता. तर ब्रिटन, अमेरिका, जर्मनी या देशांमध्ये भारतविरोधी आंदोलने करण्यात आली होती.
- देशात तीन मे पर्यंत 'या' 13 सेवा राहणार बंद...
या देशांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा करतोय भारत
१) अमेरिका
२) युनायटेड किंगडम (यूके)
३) स्पेन
४) जर्मनी
५) इटली
६) संयुक्त अरब अमिरात (यूएई)
७) जॉर्डन
८) युगांडा
९) कुवेत
१०) मलेशिया
एचसीक्यूच्या बदल्यात...
भारत एचसीक्यू व्यतिरिक्त पॅरासिटामॉलचा या देशांना पुरवठा करत आहे. या औषधांच्या बदल्यात भारताने एन-९५ मास्क, व्हेंटिलेटर, पीपीई कीट मागविले आहेत. या गोष्टींचा पुरवठा अमेरिका, ब्रिटन, आयर्लंड, दक्षिण कोरिया, जपान, जर्मनी, सिंगापूर या देशांकडून केला जात आहे.
- "राज्यावर आता दुसरं संकट", फेसबुक लाईव्हमध्ये काय म्हणालेत शरद पवार...
एचसीक्यूच्या उत्पादनात भारत आघाडीवर
झायडस कॅडिला आणि इप्का लॅबोरेटरीज या प्रमुख कंपन्यांव्यतिरिक्त देशातील अनेक कंपन्या एचसीक्यूचे उत्पादन घेतात. मार्चअखेर कंपन्यांनी आपल्या उत्पादनात चार पट वाढ केल्याने ४० मेट्रिक टन उत्पादन करण्यात आले. पुढील महिन्यात ७० मेट्रिक टनपर्यंत यात वाढ केली जाऊ शकते. जर या सर्व कंपन्यांनी पूर्ण क्षमतेनं काम केलं, तर दरमहा २००मि.ग्रॅ.च्या ३५ कोटी टॅब्लेटचे उत्पादन घेतले जाऊ शकते.
हायड्रोक्सीक्लोरोक्विन (एचसीक्यू) काय आहे?
या औषधी गोळ्यांचा उपयोग मलेरिया तसेच संधीवाताच्या उपचारांसाठी केला जातो. कोरोना व्हायरसवर अजूनपर्यंत कोणतीही लस तयार होऊ शकली नाही. मात्र, एचसीक्यूचे परिणाम चांगेल आल्याने सध्या याचा वापर केला जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एचसीक्यूला गेम चेंजर म्हटले होते.
- परप्रांतीय मजुरांच्या भावनांशी खेळू नका, कोणीही असलात तरीही सोडणार नाही : मुख्यमंत्री
याचे दुष्परिणाम काय आहेत?
कोरोनाविरोधी लढाईत एचसीक्यूला प्राथमिकता दिली जात असली तरी याचे दुष्परिणामही पुढे आले आहेत. डोकेदुखी, चक्कर येणे, खाज सुटणे, रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी होणे, भूक न लागणे, झोप येणे, नैराश्य, पटकी येणे, स्नायूमध्ये कमकुवतपणा, नाकातून रक्त येणे, ऐकू कमी येणे, श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तसेच या गोळ्यांचे जादा सेवन केल्याने मृत्यूदेखील होऊ शकतो.
Exclusive: India agrees to sell hydroxychloroquine to Malaysia to help fight COVID-19 https://t.co/8XkvtX72RU pic.twitter.com/LsFvMGZaTI
— Reuters (@Reuters) April 15, 2020