राज्यातील वाहतूकदारांच्या समस्यांसाठी कृती दलाची स्थापना; परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षेतेखाली 13 सदस्यीय दल..

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 June 2020

परिवहन मंत्री अॅड.अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील वाहतूकदारांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्यस्तरीय 13 सदस्यीय कृती दलाची स्थापना केली आहे. 

मुंबई: राज्यात कोरोना विषाणुमूळे वाहतुकदारांच्या प्रचंड समस्या निर्माण झाल्या आहे. त्यामूळे राज्यातील एसटी महामंडळ, बेस्ट उपक्रम अशा सार्वजनिक प्रवासी वाहतूकीसह ट्रक, टेम्पो, टँकर्स,बस वाहतूक, आॅटोरिक्षा, टॅक्सी, ओला उबर या खासगी वाहतुकदारांच्या अडचणीत प्रंचड वाढ झाली आहे. त्यामूळे परिवहन मंत्री अॅड.अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील वाहतूकदारांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्यस्तरीय 13 सदस्यीय कृती दलाची स्थापना केली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यात मिशन बिगीन अगेन राबवल्या जात आहे. त्या अंतर्गतच राज्य परिवहन विभागाकडून वाहतूकदारांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासोबतच अनलाॅक 1 नंतर हळुहळू राज्यातील परिस्थिती पुर्वपदावर आणतांना काय उपाययोजना करायच्या, प्रवासी वाहतूक कशी सुरू करायची, कोणत्या वाहतुदरांना परवानगी द्यायची, त्यांच्या समस्या काय ? अशा विविध विषयांवर या समितीच्या माध्यमातून लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. 

हेही वाचा: 'सार्वजनिक शौचालयांचे निर्जंतुकीकरण करा'; मुंबई महापालिका आयुक्तांचे आदेश..

त्यासाठी या समितीमध्ये राज्यातील विविध मालवाहतूक संघंटना, प्रवासी वाहतूक संघंटना, आॅटो रिक्षा, टॅक्सी, टॅक, टेम्पो अशा विविध वाहतूकदारांचे प्रतिनीधी, नागरि परीवहन उपक्रमांच्या प्रतिनिधींचा राज्यस्तरीय कृती दलामध्ये समावेश करण्यात आला आहे. 

हे असेल कृती दलाचे कार्य:

- राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, वाहतूकींशी संबंधीत बाबींमूळे होणार परिणाम, वाहतूक व्यवस्थेतील अडीअडचणी, समस्या, या बाबतींचा अभ्यास करून उपाययोजना करणे,
- परिस्थितीनुरूप वेळोवेळी निदर्शनास आलेल्या वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्यावरील उपाययोजनेसह निर्णय घेणे
- सदर कृती दलाच्या बैठका या दुरचित्रवाणी परिषद व्हिडीओ कॉन्फरंन्स याद्वारे आयोजीत करण्यात येतील

हेही वाचा: भाजप आमदार आशिष शेलारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; विचारला 'हा' महत्वाचा प्रश्न.. 

राज्यस्तरीय कृती दलातील पदे:

 • राज्य परिवहन मंत्री -- अध्यक्ष
 • अप्पर मुख्य सचिव परिवहन विभाग -- सदस्य
 • सचिव रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग -- सदस्य
 • अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक -- सदस्य
 • उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक एसटी महामंडळ -- सदस्य
 • महाव्यवस्थापक बृहनमुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम बेस्ट -- सदस्य
 • महाराष्ट्र राज्य ट्रक,टॅम्पो,टँकर्स, बस वाहतूक महासंघ प्रतिनीधी-- सदस्य
 • विविध आॅटोरिक्षा, टॅक्सी संघंटनांचे प्रतिनीधी (कमाल 4) -- सदस्य
 • अध्यक्ष महाराष्ट्र ट्रक, टॅम्पो ओनर्स असोसिएशन मुंबई -- सदस्य
 • ओला, उबर चालक संघंटनांचे प्रतिनीधी -- सदस्य
 • बस अँन्ड कार आॅपरेटर्स काॅन्फेडरेशन आॅफ इंडिया (बिओसीआय)यांचे प्रतिनीधी -- सदस्य
 • मुंबई बस मालक संघंटना याचे प्रतिनिधी -- सदस्य
 • परिवहन आयुक्त -- सदस्य सचिव
 • state transport minister made action force for problems of transporters 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state transport minister made action force for problems of transporters