राज्यात 30 हजार किलोमीटरचे रस्ते करणार - मुंडे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

सोलापूर - राज्यात 2019 पर्यंत 30 हजार किलोमीटर रस्त्यांचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून हे रस्ते केले जातील. राज्यात मागील एक- दोन वर्षांत चांगली कामे होत आहेत, हे जरी खरे असले तरी "माझी कन्या भाग्यश्री' या योजनेच्या प्रचार व प्रसारामध्ये आम्ही कमी पडलो, असल्याची खंत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. 

सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. मनोधैर्य व माझी कन्या भाग्यश्री या शासनाच्या दोन महत्त्वपूर्ण योजना आहेत. मनोधैर्यला मदत केली जाणार आहे. माझी कन्या भाग्यश्रीच्या प्रचारात आम्ही जरी कमी पडलो असलो तरी यापुढे मी जातीने लक्ष घालणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले. ग्रामविकास, जलसंधारण, महिला व बालविकास या विभागात नवीन योजनांवर फोकस केला आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ ही योजना चांगल्या रीतीने राबविली जात आहे. जलसंधारण विभागाच्या वतीने राबविली जाणारी जलयुक्त शिवार योजना राज्यासाठी फायदेशीर ठरली आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळावर मात करणे शक्‍य झाले आहे. 

Web Title: The state will have 30 thousand kilometers of roads