
हजारो विद्यार्थ्यांना दिलासा; कोरोना काळातील गुन्हे गृह विभाग घेणार मागे
मुंबई: राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भातील महत्त्वाची घोषणा केली आहे. कोरोना कालावधीमध्ये कलम 188 अंतर्गत दाखल करण्यात आलेले गुन्हे गृह विभाग मागे घेणार असल्याचं त्यांना सांगितलं आहे. कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये राज्यातील अनेक विद्यार्थ्यांवर कलम 188 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या गुन्ह्यांमुळे या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अडथळे निर्माण होत आहेत. त्याचा विचार करता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. (Corona Lockdown)
हेही वाचा: कोकणातील रिफायनरीबाबत आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले..
दहा हजारांच्या आसपास या विद्यार्थ्यांची संख्या असल्याचं समजतंय. या संदर्भात बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय की, कोरोना काळामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. या काळात काही नागरीकांवर तसेच विद्यार्थ्यांवर कलम 188 अंतर्गत गुन्हे नोंद झाले आहेत. हे सर्व गुन्हे मागे घेण्याबाबत मंत्रिमंडळात हा प्रस्ताव मांडला जाईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणामध्ये अडचणी येऊ नयेत म्हणून त्यांच्या भल्यासाठी हा निर्णय घेतला जाईल. त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरु आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. (Dilip Walse Patil)
हेही वाचा: 'झेलेन्स्कीला सांगा, मी त्यांना मारीन..' शांतता प्रस्तावानंतर पुतीन संतापले
कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांवर कलम 188 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, आता या विद्यार्थ्यांना पासपोर्ट, उच्च शिक्षण घेण्यासाठी अडचण होत आहे त्यामुळे गृह विभागाने त्यांचा विचार करुन हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील अंमलबजावणीसाठी गृह खात्याने राज्यांतील 188 अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यांची माहिती मागवली आहे.
Web Title: State Withdrawal Of Criminal Cases Filed Under 188 During The Corona Period On Students
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..