करकरे यांच्याविषयीचे विधान अयोग्य - फडणवीस 

करकरे यांच्याविषयीचे विधान अयोग्य - फडणवीस 

मुंबई - राज्यात मोदी लाट असून 2014 मध्ये केवळ मध्यमवर्गीय सोबत होते, आता कोणत्याही सर्व्हेक्षणाचा विषय नसलेले गोरगरीब मतदारही मोदींसमवेत असल्याचा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांनी हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य अयोग्य होते, असेही फडणवीस यांनी नमूद केले. 

दिवंगत हेमंत करकरे महाराष्ट्र पोलिस दलातील अत्यंत उमदे, प्रामाणिक अधिकारी होते. साध्वींची व्यक्तिगत पीडा मोठी असली तरी त्यांचे कथन योग्य नव्हते, असे फडणवीस म्हणाले. एनआयएच्या आरोपपत्रात साध्वींना क्‍लीन चिट मिळाली असल्यामुळे त्यांची उमेदवारी मात्र आक्षेपार्ह नाही. राहुल गांधीदेखील जामिनावरच असल्याचे फडणवीस यांनी या वेळी निदर्शनास आणून दिले. प्रचार दौऱ्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, की राज ठाकरे हे सध्या निवडणुकीत खेळाडू नसल्याने त्यांच्याबद्दल काय बोलायचे; ते मैदानात उतरतील तेव्हा त्यांच्याविषयी निश्‍चित बोलू. आज ते काहीही बोलत असून, ट्रम्प यांनी देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला, असे अर्थहीन विधानही ते करू शकतात, असे ते म्हणाले. राज्यात सुमारे 60 सभा फडणवीस यांनी घेतल्या असून, राज्यात 40 चा आकडा युती ओलांडेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com