#MarathaKrantiMorcha आंदोलन थांबवा; चर्चेला या - नारायण राणे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

मुंबई - राज्यभरात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आगडोंब उसळलेला असल्याने हे आंदोलन थांबवावे, असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन असल्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सांगितले. राज्यातील सद्यःस्थितीबाबत ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठा आरक्षणासाठी सरकार सक्षम असून, सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाच्या धर्तीवर आरक्षण मिळू शकते. त्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मराठा आंदोलकांनी आंदोलन थांबवून चर्चेसाठी समोर यावे. मी स्वत: या आंदोलकांना मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेला बसवू शकतो, असे राणे यांनी स्पष्ट केले. 

तत्कालीन कॉंग्रेस आघाडी सरकारमध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्यव्यापी सुनावणी घेऊन माझ्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल दिला होता. त्याच अहवालाच्या धर्तीवर आघाडी सरकारने सोळा टक्‍के मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला. त्यामुळे, मराठा आरक्षण देण्यात अडचण नाही; पण आंदोलन थांबवले तरच चर्चा होतील. त्यातून तोडगा निघेल. कोणतेही आंदोलन तुटेपर्यंत ताणू नये, असे राणे यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Stop the agitation says Narayan Rane