...तर मेगा नोकरभरती थांबवा 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 27 जुलै 2018

मुंबई - मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्या. तोपर्यंत मेगाभरती करण्याची प्रक्रिया थांबवा, असे आवाहन केले आहे. कदम यांनी हे पत्र 20 जुलैला मुख्यमंत्र्यांना दिले असून, मराठा आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावर शिवसेना पहिल्यांदाच निर्णायक भूमिकेत असल्याचे चित्र आहे. मराठा समाजाने जगाला आदर्श घालून देणारे 57 मोर्चे शांततेत काढले. पण, सरकारने त्यावर ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे, मराठा समाज संतप्तपणे रस्त्यावर उतरला आहे.

मुंबई - मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्या. तोपर्यंत मेगाभरती करण्याची प्रक्रिया थांबवा, असे आवाहन केले आहे. कदम यांनी हे पत्र 20 जुलैला मुख्यमंत्र्यांना दिले असून, मराठा आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावर शिवसेना पहिल्यांदाच निर्णायक भूमिकेत असल्याचे चित्र आहे. मराठा समाजाने जगाला आदर्श घालून देणारे 57 मोर्चे शांततेत काढले. पण, सरकारने त्यावर ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे, मराठा समाज संतप्तपणे रस्त्यावर उतरला आहे. पण, मेगाभरतीचे कारण पुढे करत सरकार सामाजिक दुफळी करण्याचा प्रयत्न करत असल्याची भावना मराठा समाजात असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या मेगा भरतीचा केवळ निर्णय झालेला असून अद्याप सरकारने कोणत्याही पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही. त्यामुळे, मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्यावा व नंतरच मेगाभरतीची प्रक्रिया सुरू करावी, अशी भूमिका कदम यांनी मांडली आहे. मेगाभरतीच्या निर्णयावरून समाजा समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी सरकारने घ्यायला हवी. मराठा समाजाला डावलून मेगाभरतीची प्रक्रिया सुरू झाल्यास या ठिणगीचे रूपांतर वणव्यात होण्याची भीतीदेखील रामदास कदम यांनी व्यक्‍त केली आहे. दरम्यान, सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुंबईत एक दिवसाचे अधिवेशन बोलावून आरक्षणाचा ठराव एकमताने मंजूर करावा, अशी मागणीही रामदास कदम यांनी या पत्रात केली आहे. 

Web Title: Stop mega recruitment says shivsena