
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबादेत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करणार : शंभूराज देसाई
सातारा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादमधील सभेला (Aurangabad Rally) पोलिसांनी अटी-शर्थींसह परवानगी दिली होती. त्यानुसार औरंगाबाद पोलिसांचं राज ठाकरेंच्या सभेकडं आणि त्यांच्या भाषणावर करडी नजर होती. या प्रकरणात औरंगाबाद पोलिसांनी एक अहवाल तयार केला होता आणि तो अहवाल पोलीस महासंचालकांना (Maharashtra DGP) पाठवण्यात आला होता. त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबादेत गुन्हा दाखल करण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. ते साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधत होते.
शंभूराज देसाई म्हणाले, महाराष्ट्रात कोणी अल्टिमेटम देण्याची भाषा करू नये. हे राज्य कायद्यानं चालणारं असून कायद्याचं पालन सगळ्यांनी केलं पाहिजे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडणार असेल, तर पोलिस (Police) निश्चितपणे त्यांच्यावर कठोर कारवाई करतील. तसेच संभाजीनगरमधील सभेनंतर पोलिस आयुक्तांनी सविस्तर तपास केल्यानंतर, ही कारवाई केली असेल. त्यामुळं त्यांनी केलेली ही कारवाई नियमाला धरून व अटींचा भंग झाला म्हणूनच केली असावी. ज्यांचा-ज्यांचा या सभेत सहभाग होता, ज्यांनी-ज्यांनी त्या सभेमध्ये याठिकाणी भाग घेतलेला आहे, अशा काही लोकांना कदाचित नोटीस दिल्या गेल्याची शक्यता आहे.
हेही वाचा: 'बाळासाहेब ठाकरेंप्रमाणं फडणवीसांनी तेव्हा का जबाबदारी स्वीकारली नाही'
देसाई पुढं म्हणाले, मला त्याची सविस्तर माहिती प्राप्त नाहीय, परंतु ज्यानं कोणी अटींचं उल्लंघन केला असेल त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. अल्टिमेटम वगैरे असा कोणी देण्याची भाषा महाराष्ट्रात करू नये, हे राज्य कायद्यानं चालणारं असून कायद्याचं पालन आणि सगळ्यांनी केलं पाहिजे. कायदा मोडून कोणी राज्यातली सुव्यवस्था बिघडणार असेल, तर पोलिस निश्चितपणे त्यांच्यावर कठोर कारवाई करतील, असा इशाराही त्यांनी दिलाय.
Web Title: Strict Action Will Be Taken Against Those Violating The Law Shambhuraj Desai At Satara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..