"राष्ट्रवादी'च्या प्रचारात विद्यार्थी संघटनांची उडी 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

मुंबई - लोकसभा व विधानसभा निवडणुकीतली पराभूत मानसिकता झटकत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विद्यार्थी संघटनांनी जिल्हा परिषदा व महानगरपालिकांच्या प्रचारात जोरदार मुसंडी मारण्याची रणनीती आखली आहे. 

मुंबई - लोकसभा व विधानसभा निवडणुकीतली पराभूत मानसिकता झटकत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विद्यार्थी संघटनांनी जिल्हा परिषदा व महानगरपालिकांच्या प्रचारात जोरदार मुसंडी मारण्याची रणनीती आखली आहे. 

प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील म्हणाले, ""सोशल मीडिया विभागासह विद्यार्थी नेत्यांचा कोपरा सभा घेण्यावर प्रचारात भर राहणार आहे.'' राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने गेल्या वर्षात राज्यभरात महाविद्यालयीन युवकांच्या संघटनांवर लक्ष केंद्रित करीत विविध विषयांवर प्रत्येक जिल्ह्यात लक्षवेधी मोर्चे काढले आहेत. त्यातून "राष्ट्रवादी'च्या युवकांची भक्‍कम फळी राज्यात उभी राहिली असून, या युवा नेत्यांचे चेहरे प्रचारात उतरविले जात आहेत. 16 लाख दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांसाठी 14 मोर्चे काढून राष्ट्रवादीने युवक बांधणीचा प्रयत्न केला आहे. सध्या या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या मोर्चांची सहानुभूती घेत राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने प्रचाराची रणनीती आखली आहे. 

आतापर्यंत सहा विद्यापीठांची उपकेंद्रे यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे मोर्चे महत्त्वाचे मानले गेले होते. विद्यार्थी नेत्यांचे राज्यभरातले पथक गावोगावी कोपरा सभा, सोशल मीडियावरील प्रचार यंत्रणा, पथनाट्य या माध्यमांतून "राष्ट्रवादी'ची भूमिका मतदारांसमोर मांडणार असल्याचे संग्राम कोते पाटील यांनी सांगितले.

Web Title: Student organizations campaigning rastravadi