हिंदुस्तानी भाऊच्या व्हिडिओनंतर १०वी, १२वीचे विद्यार्थी आक्रमक? | Hindustani Bhau Demand to Take Online Exam of 10th & 12th Exam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hindustani Bhau Demand to Take Online Exam of 10th & 12th Exam

हिंदुस्तानी भाऊच्या व्हिडिओनंतर १०वी, १२वीचे विद्यार्थी आक्रमक?

मुंबई : दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी आज विद्यार्थी अचानक रस्त्यावर उतरले. नागपूर (Nagpur), अकोला (Akola) आणि पुण्यात (Pune) शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलन (10th 12th Student Agitation) केले. मात्र, विद्यार्थ्यांनी अचानक ही मागणी का केली? असा प्रश्न आहे. चार दिवसांपूर्वी एक हिंदुस्थानी भाऊचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.(Hindustani Bhau Demand to Take Online Exam of 10th & 12th Exam)

हेही वाचा: दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करा

हिंदुस्थानी भाऊनं व्हिडिओमध्ये काय म्हटलं? -(Hindustani Bhau Viral Video)

दोन वर्षात कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचे देखील मृत्यू झाले आहेत. या धक्क्यातून कुटुंब अजून सावरलेलं नाही. आता ओमिक्रॉन आला आहे. स्वतः सरकार म्हणतेय की घरात राहा, काळजी घ्या. मग सरकार विद्यार्थ्यांचा बळी का देत आहे? प्रोफेसर ऑनलाइन बैठक घेत आहेत. तुम्हाला तुमच्या जीवाची काळजी आहे, तर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ का? असा सवाल हिंदुस्थानी भाऊनं त्याच्या व्हिडिओमधून केला आहे.

'लाखो विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरणार' -

विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले तर विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन का? विद्यार्थ्यांच्या जीवासोबत खेळू नका. त्यावेळी मी एकटा रस्त्यावर उतरलो होतो. आता देखील तुम्हाला विनंती करतोय की विद्यार्थ्यांसोबत खेळू नका. आता पण कोरोनामुळे परिस्थिती गंभीर आहे. त्यांच्या करिअरसोबत खेळू नका. तेव्हा मी एकटा रस्त्यावर उतरलो होतो आता लाखो विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरणार, असा इशारा त्यांनी दिला होता.

...तर तांडव होईल -

मी जे बोलतोय ते खरं करून दाखवतो. त्यामुळे देशातील सर्व विद्यार्थ्यांकडून विनंती करतोय, की परीक्षा रद्द करा किंवा ऑनलाइन घ्या. विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी घ्या, असं आवाहन हिंदूस्थानी भाऊनी केलं आहे. नाहीतर एक नवे आंदोलन उभं राहील. सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाहीतर तांडव होईल. गुन्हा दाखल केला तरी मी घाबरणार नाही, अशी थेट धमकी देखील हिंदुस्थानी भाऊनं दिली आहे.

Web Title: Students Agitation After Viral Video Of Hindustani Bhau Demand To Cancel 10th 12th Exam

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :examstudent10th exam
go to top