10th 12th board exams News | दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Cancel 10th 12th board exams students demand to Minister of Education

दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करा

औरंगाबाद : कोरोनामुळे वर्षभरापासून शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाचा लिहिण्याचा सराव राहिलेला नाही. अशा परिस्थितीत शासन विद्यार्थ्यांचा विचार न करता दहावी, बारावीच्या परीक्षा घेत आहे. त्यामुळे या परीक्षा रद्द कराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात सोमवारी (ता.३१) जिल्हाधिकारी यांना विद्यार्थ्यांमार्फत निवेदन देण्यात येणार आहे.

हेही वाचा: निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे, औरंगाबादेत बॅनरची चर्चा

निवेदनात म्हटले की, मागील दोन वर्षांपासून शाळा, कॉलेज पूर्णपणे बंद आहेत. संपूर्ण अभ्यासक्रम हा ऑनलाइनरीत्या झालेला आहे. तरी शासनाने मार्च-एप्रिल महिन्यात परीक्षा जाहीर केल्याने विद्यार्थी मानसिकरीत्या खालावले आहेत. अनेक विद्यार्थी हे टोकाचं पाऊल देखील उचलू शकतात. कारण अभ्यासाकरिता फक्त एक महिन्याचा वेळ असल्याने अभ्यास होणे शक्य नाही. दोन वर्षांपासून अभ्यासाचा लिहिण्याचा सराव राहिलेला नाही, अशा परिस्थितीत शासन विद्यार्थ्यांचा विचार न करता परीक्षा घेत आहे. ही परीक्षा रद्द करण्यात यावी.

हेही वाचा: अर्थसंकल्पीय अधिवेशन : देशाच्या प्रगतीसाठी चर्चा करावी - PM मोदी

या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे विद्यार्थ्यांमार्फत शिक्षणमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे. सहा दिवसांत मागणी मान्य न झाल्यास सर्व विद्यार्थी हे रस्त्यावर उतरतील, असा इशारा निवेदनाद्वारे विद्यार्थी सुमीत पवार, वैभव परदेशी, सुमेध गायकवाड, आदित्य महालदार, प्रेम हिवाळे, तुषार लहाने, यश जाधव, रितेश बहादुरे आदींनी दिला आहे.

Web Title: Aurangabad Cancel 10th 12th Board Exams Students Demand To Minister Of Education

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top