रद्दीच्या बदल्यात विद्यार्थ्यांना वह्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

मुंबई - विद्यार्थ्यांना रद्दीच्या बदल्यात नव्या कोऱ्या वह्या मिळणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि "नमोआनंद अपसायकलर्स' यांच्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत नुकताच सामंजस्य करार झाला. 

ही योजना राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, महापालिका, सरकारी अनुदानित शाळा, निमसरकारी शिक्षण संस्थांमध्ये राबवली जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. वंदना कृष्णा आणि नमोआनंद कंपनीचे संचालक आनंद जितेंद्र कोठारी, जितेंद्र स्वरूपचंद कोठारी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. 

राज्यभरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडील रद्दी या कंपनीकडे दिल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याबदल्यात नव्या कोऱ्या "ग्रीन नोटबुक' व अन्य साहित्य मिळणार आहे. ही योजना दीड वर्षापूर्वी पुण्यातील महापालिका शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आली होती. त्या वेळी चांगला प्रतिसाद मिळाला. या योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या वह्या 100 टक्के पर्यावरणपूरक असून, त्या पुनर्निर्मित कागदापासून बनवलेल्या आहेत, असे शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. 

Web Title: The students get new notebooks in exchange for the old books